MSRTC Bharti 2025 : परीक्षा न देताच ST महामंडळात मिळणार नोकरी, शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा अर्ज...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३६७ प्रशिक्षणार्थी पदे भरली जाणार आहेत.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३६७ प्रशिक्षणार्थी पदे (Apprenticeship) भरली जाणार आहेत. या भरतीचे प्रमुख वैशिष्ट्ये असे आहे की, यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. ही संधी दहावी पास उमेदवारांपासून ITI आणि पदवीधरांपर्यंत सरकारी विभागात काम करणाऱ्या अनेक तरुणांसाठी आहे.
अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असताना त्यांच्यासाठी ही फार महत्वाची बातमी आहे. दरम्यान, एसटी महामंडळामध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती नाशिक येथे होणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेंटर आणि डिझेल मेकॅनिक यांसारख्या अनेक पदांचा समावेश आहे. एसटी महामंडळातल्या प्रशिक्षणार्थी पदासाठीच्या भरतीसाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, आयटीआय किंवा इंजिनीअरिंगची पदवी असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
advertisement
प्रत्येक पदासाठी पात्रतेची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरातीत आपली पात्रता काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. उमेदवारांनी प्रथम http://www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर अर्ज भरून तो एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक या पत्त्यावर जमा करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर २०२५ आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वेळ फार कमी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून आपला अर्ज नमूद केलेल्या अर्जावर पाठवावा.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 10, 2025 5:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MSRTC Bharti 2025 : परीक्षा न देताच ST महामंडळात मिळणार नोकरी, शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा अर्ज...