दिवा लावताना लांब की गोल वात वापरावी? ही चूक पडू शकते महागात, जाणून घ्या कधी कोणती वात वापरावी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात आणि दैनंदिन पूजेत दिवा प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. मात्र, पूजेत आपण कोणती वात वापरतो लांब की गोल यावर मिळणारे फळ अवलंबून असते. शास्त्रानुसार या दोन्ही वातींचे महत्त्व आणि परिणाम वेगवेगळे आहेत.
Vastu Tips : हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात आणि दैनंदिन पूजेत दिवा प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा केवळ घराला प्रकाशमान करत नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकताही दूर करतो. मात्र, पूजेत आपण कोणती वात वापरतो लांब की गोल यावर मिळणारे फळ अवलंबून असते. शास्त्रानुसार या दोन्ही वातींचे महत्त्व आणि परिणाम वेगवेगळे आहेत.
लांब वातीचा दिवा: धन, यश आणि समृद्धी
लांब वातीचा दिवा प्रज्वलित करणे हे प्रगती आणि वाढीचे प्रतीक मानले जाते. शास्त्रांनुसार, लक्ष्मी माता, सरस्वती माता, दुर्गा माता यांसारख्या देवींची पूजा करताना नेहमी लांब वातीचा दिवा लावावा. तसेच कुलदेवतेच्या पूजेतही लांब वात वापरणे शुभ असते. असे मानले जाते की लांब वातीचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. समाजात मान-सन्मान आणि यश मिळवण्यासाठी लांब वात अत्यंत प्रभावी मानली जाते. दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने लांब वातीचा दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे.
advertisement
गोल वातीचा दिवा: शांती, स्थिरता आणि भक्ती
गोल वात किंवा 'फूल वात' ही स्थिरता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. ब्रह्मा, विष्णू, महादेव, इंद्रदेव किंवा इतर कोणत्याही देवतेच्या पूजेसाठी गोल वातीचा दिवा वापरला जातो. तसेच कोणत्याही मंदिरात किंवा तुळशीसमोर दिवा लावताना गोल वात वापरणे अधिक योग्य मानले जाते. गोल वातीचा दिवा लावल्याने मनातील अस्थिरता दूर होते आणि घरात शांतीचे वातावरण निर्माण होते. देवाप्रती तुमची भक्ती वाढवण्यासाठी आणि एकाग्रतेसाठी गोल वात मदत करते.
advertisement
कोणत्या वेळी कोणती चूक टाळावी?
काही लोक चुकून कोणत्याही देवासमोर कोणतीही वात लावतात, मात्र शास्त्रात त्याबद्दल स्पष्ट नियम आहेत. लक्ष्मी किंवा कुलदेवीसमोर गोल वात लावल्याने घराची प्रगती खुंटू शकते, असे मानले जाते. त्यामुळे तिथे प्रगतीसाठी लांब वात वापरा. पितरांच्या नावाने कधीही गोल वात लावू नका, यामुळे घरात अडथळे येऊ शकतात. तिथे नेहमी लांब वातच असावी.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
दिवा लावताना लांब की गोल वात वापरावी? ही चूक पडू शकते महागात, जाणून घ्या कधी कोणती वात वापरावी









