लग्नासाठी कमीत कमी किती गुण जुळणे आवश्यक; जाणून घ्या, सुखी जीवनाचं हे महत्त्वाचं रहस्य
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
marriage tips - ज्योतिष शास्त्रानुसार, जर कुंडलीत नाडी दोष, मांगलिक दोष, गण दोष यांचे समाधान केले नाही तर वर आणि वधुच्या आयुष्यात संकटे येतात. ज्योतिषी सांगतात की, कुंडलीत मांगलिक दोष, नाडी दोष आणि गण दोष जुळायला हवेत.
ओम प्रयास, प्रतिनिधी
हरिद्वार - सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. मात्र, अनेकांना लग्न जुळण्यास समस्या येत येतात. अनेकांचे लग्न जुळत नाही. त्यामुळे विविध उपाय केले जातात. तर लग्नात भविष्यात येणाऱ्या संकटापासून बचावासाठी मुलगा आणि मुलीची कुंडली जुळवली आते. हिंदू धर्मातील ग्रंथांनुसार, भविष्यातील सर्व संकटांपासून बचावाचा कुंडली जुळवणे हा एकमेव उपाय आहे. जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघांच्या कुंडली जुळवली जाते, तेव्हा जास्तीत जास्त गुण जुळत आहेत की नाही, मांगलिक दोष, नाडी दोष, गण दोष या सर्व बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात.
advertisement
लग्नाआधी कुंडली जुळवणे का गरजेचे?
ज्योतिष शास्त्रानुसार, जर कुंडलीत नाडी दोष, मांगलिक दोष, गण दोष यांचे समाधान केले नाही तर वर आणि वधुच्या आयुष्यात संकटे येतात. ज्योतिषी सांगतात की, कुंडलीत मांगलिक दोष, नाडी दोष आणि गण दोष जुळायला हवेत. जर हे सर्व जुळले नाहीत, तर वर वधूंच्या आयुष्य हे दुःख आणि समस्यांनी भरलेले असते आणि त्यांचे लग्न तुटते.
advertisement
लग्नासाठी किती गुण मिळणे आवश्यक?
पंडित श्रीधर यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा कुंडलीत मांगलिक दोष, नाडी दोष आणि गुण दोष सर्वात आधी पाहिले जाते. कुंडलीत एकूण गुणांची संख्या 36 आहे. जर मुलगा आणि मुलीचे गुण 32-36 पर्यंत जुळत असतील तर ती सर्वोत्तम कुंडली जुळते.
advertisement
कमीत कमी किती गुण जुळावेत?
लग्न करण्यासाठी किमान 18 गुण असणे आवश्यक आहे. जर 18 पेक्षा कमी गुण आढळले तर लग्न झाल्यावर जीवनात दुःख आणि समस्या येतात. तसेच वैवाहिक संबंध लवकरच तुटतात. लग्नाआधी मुला-मुलींचा मांगलिक दोष पहिल्यांदा पाहिला जातो, असेही पंडित श्रीधर शास्त्री यांनी सांगितले.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
Nov 18, 2024 12:34 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्नासाठी कमीत कमी किती गुण जुळणे आवश्यक; जाणून घ्या, सुखी जीवनाचं हे महत्त्वाचं रहस्य








