महादेवाचे अद्भूत मंदिर, जे दिवसातून 2 वेळा होते गायब! यामागचं नेमकं रहस्य काय?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
गुजरातमधील स्तंभेश्वर महादेव मंदिर हे एक अनोखे मंदिर आहे, जे दिवसातून दोनदा समुद्रात अदृश्य होते आणि पुन्हा प्रकट होते. हे मंदिर ताडकासुर वधाच्या घटनांशी जोडलेले आहे. येथे शिवलिंगाची स्थापना स्वयं कार्तिकेय यांनी केली होती. समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे हे मंदिर अदृश्य होते.
भारत आपल्या प्राचीन मंदिरांमुळे आणि विविधतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथे अनेक मंदिरे आहेत जी त्यांच्या अद्भुत आणि रहस्यमयी वैशिष्ट्यांमुळे भक्तांना आकर्षित करतात. असेच एक अनोखे मंदिर गुजरातमध्ये आहे जे दिवसातून दोनदा दिसते आणि गायब होते. या मंदिराचे नाव स्तंभेश्वर महादेव मंदिर आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिराचा इतिहास
स्तंभेश्वर महादेव मंदिर गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील जंबूसर जवळ कवी कंबोई गावात आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनारी आहे. हे मंदिर सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसातून दोनदा दिसते आणि नंतर समुद्रात बुडते आणि थोड्या वेळाने पुन्हा दिसते. या मंदिराचे रहस्य काय आहे?
advertisement
या मंदिराशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक कथा तारकासुरचा अंत आणि स्तंभेश्वरची स्थापना आहे. एकेकाळी तारकासुर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले. भगवान शिवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. तारकासुराने अमरत्वाचे वरदान मागितले पण भगवान शिव म्हणाले की, हे शक्य नाही. मग तारकासुराने असे वरदान मागितले की, त्याचा वध फक्त शिवाच्या मुलाकडूनच होऊ शकतो आणि त्या मुलाचे वयही फक्त सहा दिवस असावे. भगवान शिवाने त्याला हे वरदान दिले.
advertisement
वरदान मिळाल्यानंतर तारकासुर अहंकारी झाला. त्याने देव आणि ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन सर्वजण भगवान शिवाकडे गेले आणि तारकासुरला मारण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि श्वेता पर्वतकड्यातूल सहा दिवसांचे बाळ कार्तिकेय जन्माला आले. कार्तिकेयाने तारकासुरचा वध केला पण जेव्हा त्याला कळले की तारकासुर हा शिवाचा भक्त होता, तेव्हा त्याला खूप दुःख झाले.
advertisement
कार्तिकेयाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने भगवान विष्णूंना प्रायश्चित्ताचा मार्ग विचारला. भगवान विष्णूंनी त्याला ज्या ठिकाणी त्याने तारकासुरला मारले होते, तिथे शिवलिंग स्थापित करण्याचा सल्ला दिला. कार्तिकेयाने तेच केले. त्याने तिथे एक सुंदर शिवलिंग स्थापित केले. हे ठिकाण पुढे स्तंभेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. आजही कार्तिकेय त्या शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी येतो, असे मानले जाते. या मंदिराच्या अदृश्य होण्यामागे एक नैसर्गिक कारण आहे. हे मंदिर अशा ठिकाणी आहे जिथे मोठी भरती येते. समुद्रात भरती येते तेव्हा मंदिर पाण्यात बुडते. जेव्हा ओहोटी येते, तेव्हा पाण्याची पातळी कमी होते आणि मंदिर पुन्हा दिसते.
advertisement
स्तंभेश्वर महादेवाचे दर्शन कसे घ्यावे?
स्तंभेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला भरतीच्या वेळा लक्षात ठेवाव्या लागतील. मंदिराचे पुजारी तुम्हाला भरतीच्या वेळा सांगतील जेणेकरून तुम्ही भरती दिसल्यानंतरच मंदिराला भेट देऊ शकता.
स्तंभेश्वर महादेव मंदिराशी संबंधित मान्यता
स्तंभेश्वर महादेव मंदिराबद्दल अनेक मान्यता आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शिव स्वतः या मंदिरात प्रकट होतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की या मंदिरात मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात.
advertisement
हे ही वाचा : घरात या दिशेला ड्रेसिंग टेबल असेल, तर पती-पत्नीचा वाद जातो विकोपाला, ही आहे योग्य दिशा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 11:22 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महादेवाचे अद्भूत मंदिर, जे दिवसातून 2 वेळा होते गायब! यामागचं नेमकं रहस्य काय?