Navratri Fasting Rules 2023: शारदीय नवरात्रीचा उपवास करताना 'या' चुका टाळा
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
नवरात्र उपवास नियम 2023 : काय करावं आणि काय टाळावं
मुंबई : हिंदू धर्मातील शुभ सण नवरात्र अगदी काही दिवसांनी सुरू होत आहे. दुर्गामातेचे भक्त नऊ दिवसांचा हा सण प्रेम आणि उत्साहाने साजरा करतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भक्त दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांची पूजा करतात आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात.
नवरात्र वर्षातून चार वेळा साजरं केलं जातं. या मध्ये शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, माघ नवरात्र आणि आषाढ गुप्त नवरात्राचा समावेश होतो. या पैकी दोन नवरात्रांमध्ये समाजात जास्त उत्साह पाहायला मिळतो. हिंदू पंचांगानुसार पहिलं चैत्र नवरात्र, जे मार्च किंवा एप्रिल महिन्यात वसंत ऋतूमध्ये येतं आणि दुसरं शारदीय नवरात्र जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतं.
advertisement
यंदा शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत साजरं केलं जाणार असून, त्याची सांगता दसऱ्याला होणार आहे. या उत्सवादरम्यान, भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि नवरात्र घटस्थापना, दुर्गा आरती, दुर्गा चालिसा पठण, दुर्गा सप्तशती पाठ, कन्या पूजा असे विधी करतात. या शिवाय गरबा आणि दांडिया नाईट्स आयोजित करून नृत्याचा आनंद लुटतात.
advertisement
नऊ दिवसांचा उपवास प्रामुख्याने दुर्गादेवीची उपासना आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी योग्य पद्धतीने करायचे असतात. चला तर मग, उपवास करताना आपण काय करायला हवं आणि काय करू नये या विषयी जाणून घेऊ या.
नवरात्र उपवास नियम 2023 : काय करावं आणि काय टाळावं
advertisement
- नऊ दिवसांच्या उत्सवात भाविकांनी लवकर उठून पवित्र स्नान करावं.
- नऊ दिवसांच्या उपवासात भाविकांनी दारू, तंबाखू आणि मांसाहार टाळावा.
- नवरात्रच्या उपवासात नखं कापणं, केस कापणं किंवा दाढी करणं टाळावं.
- उपवासाचा एक भाग म्हणून भक्त फराळात कुट्टू, सिंघाडे, भगर (वरई), दूध, साबुदाणा, बटाटे आणि फळं खाऊ शकतात.
advertisement
-नवरात्रच्या उपवासात मोहरीचं तेल आणि तीळ खाणं टाळावं. एक पर्याय म्हणून शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरू शकता.
- उपवासात प्रोसेस्ड मीठ वापरणं टाळा. तुम्ही तुमच्या नवरात्राच्या पाककृतींसाठी रॉक सॉल्ट किंवा सैंधव वापरू शकता.
- उपवास असेल तर दिवसा झोपू नये हे भाविकांनी लक्षात ठेवावं.
- पूजा करणार्या किंवा उपवास करणार्या भक्तांनी नेहमी फ्रेश आणि स्वच्छ कपडे घालावे. चामड्याचे कपडे किंवा अॅसेसरीज घालू नयेत. या व्यतिरिक्त, त्यांनी काळे कपडे घालणं टाळावं.
advertisement
- लहान मुलं, गरोदर स्त्रिया किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांनी व्रत करणं टाळावं.
- नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये, दुर्गेमातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची प्रार्थना करावी आणि मातेचा दयाळूपणा अंगात बाणवण्याचा प्रयत्न करावा.
नोट : ही माहिती सामान्य माहितीव आधारीत असून न्यूज18 याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत फक्त माहिती पोहोचवणे हा आहे. न्यूज18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 11, 2023 4:16 PM IST








