advertisement

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण किती वाजता, मुंबईत दिसणार का? 'रिंग ऑफ फायर'चा थरार केवळ 'इतक्याच' मिनिटांचा

Last Updated:

आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'रिंग ऑफ फायर' असेही म्हणतात.

News18
News18
Surya Grahan Timing : आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'रिंग ऑफ फायर' असेही म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, परंतु सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा सूर्याचा मधला भाग काळा पडतो आणि कडेने एक प्रकाशवलय दिसते, जे एखाद्या आगीच्या अंगठीसारखे भासते.
सूर्यग्रहणाची अचूक वेळ
टप्पावेळ ग्रहणाची सुरुवात दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी होईल तर, ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी होईल ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी होईल. हे ग्रहण सुमारे 4 तास 31 मिनिटे चालणार आहे. मात्र, 'रिंग ऑफ फायर'चा मुख्य थरार केवळ 2 मिनिटे 20 सेकंदांचा असेल.
शहरानुसार सूर्यग्रहणाची वेळ
जरी हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी सुरू होणार असले, तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे प्रामुख्याने अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि हिंदी महासागराच्या काही भागांत दिसणार आहे. भारतातून हे दृश्यमान नसल्यामुळे, दिल्ली, मुंबई, पुणे किंवा नागपूर यांसारख्या शहरांमध्ये याच्या वेळेचा थेट प्रभाव दिसणार नाही.
advertisement
सूर्यग्रहणाचे महत्वाचे मुद्दे
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण भारताच्या क्षितिजावर दिसणार नसल्यामुळे भारतीयांना हे प्रत्यक्ष पाहता येणार नाही. शास्त्रानुसार, जिथे ग्रहण दिसत नाही, तिथे सूतक काळ पाळला जात नाही. त्यामुळे भारतात आज मंदिरे उघडी राहतील आणि दैनंदिन कामांवर कोणतेही निर्बंध नसतील. या ग्रहणावेळी चंद्र सूर्याचा 96% भाग झाकून टाकेल, ज्यामुळे आकाशात सोन्याच्या अंगठीसारखे दृश्य दिसेल. आज माघ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग आला आहे. भारतात ग्रहण दिसत नसल्याने अमावस्येचे तर्पण आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे करता येतील. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, चिली आणि विशेषतः अंटार्क्टिका खंडात स्पष्टपणे दिसेल. जर तुम्हाला हे ग्रहण पाहायचे असेल, तर तुम्ही अधिकृत यूट्यूब चॅनेल्सवर याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण किती वाजता, मुंबईत दिसणार का? 'रिंग ऑफ फायर'चा थरार केवळ 'इतक्याच' मिनिटांचा
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement