Ashadhi Wari 2025: 340 वर्षांची परंपरा, निवडुंगा विठोबा मंदिरात असते संतांची पालखी विसाव्यासाठी, इतिहास माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
लाखो वारकरी दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा जयघोष करत पायी वारी करत असतात. अशाच या पालखी सोहळ्याचा पुण्यातील महत्त्वपूर्ण मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिर असतो.
पुणे : वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, ती स्वर्गसुखाचा अनुभव देणारा एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा आहे. लाखो वारकरी दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा जयघोष करत पायी वारी करत असतात. अशाच या पालखी सोहळ्याचा पुण्यातील महत्त्वपूर्ण मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिर असतो.
हे मंदिर केवळ विसाव्याचं ठिकाण नसून, 850 वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. निवडुंगा विठोबा मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू असून तिच्या डाव्या हातात कमळ, उजव्या हातात शंख, गळ्यात माळ आणि अंगावर जानवे आहे. ही मूर्ती निवडुंगाच्या झाडात सापडल्यामुळे या मंदिराला निवडुंगा विठोबा असे नाव प्राप्त झाले आहे.
advertisement
पालखी सोहळ्याची ही 340 वी परंपरा असून संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. तेव्हापासून ही अखंड परंपरा अखंड श्रद्धेने आणि भक्तिभावाने चालू आहे. वारी हा कुठलाही इव्हेंट नाही. याला ना ऑर्गनाइजर असतो ना तिकीट लागतं, तरीही लाखो लोक स्वतःहून सहभागी होतात, हीच खरी भक्ती आहे, असे पालखी सोहळा प्रमुख रविंद्र पाद्य यांनी सांगितले.
advertisement
मंदिर परिसरात राहण्याची, जेवणाची, आणि वैद्यकीय सेवा यांची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी महिला आयोगाच्या वतीने हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.
वारी ही संतांची देणगी असून, साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ही भावना प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. या पवित्र ठिकाणी वारकऱ्यांना भक्ती, सेवाभाव, आणि सामूहिक साधनेचा संगम अनुभवायला मिळतो. निवडुंगा विठोबा मंदिराचा इतिहास आणि वारीतील त्याचे महत्त्व, दोघेही वारकऱ्यांच्या श्रद्धेला अधिक बळ देतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 21, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi Wari 2025: 340 वर्षांची परंपरा, निवडुंगा विठोबा मंदिरात असते संतांची पालखी विसाव्यासाठी, इतिहास माहितीये का?