आता बीडमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, पाहा कशी मिळणार संधी?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
उत्तराखंडमधील केदारनाथाचं दर्शन आता बीडमध्ये घेता येणार आहे. तब्बल 13 लाख रुपये खर्चून मंदिर उभारण्यात आलंय.
बीड, 24 सप्टेंबर: गणेशोत्सवात गणेश मंडळांनी आरास आणि देखावे भाविकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत. यंदा अनेक गणेश मंडळांनी धार्मिक, ऐतिहासिक देखावे सादर केले आहेत. तर काही ठिकाणी विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. बीड शहरात देखील 40 वर्षांपेक्षा अधिक जुने गणेश मंडळ असून या ठिकाणी देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचा देखावा केला जातो. यंदा देखील तब्बल 13 लाख रुपये खर्चून केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आलाय. बीडकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करत आहेत.
मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्याची परंपरा
पेठ बीड भागातील शनी मंदिर गल्लीतील विठ्ठल मंदिर परिसरामध्ये बीडचा न्यू राजा गणेश मित्र मंडळ आहे. 1954 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने देशातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिरांचा देखावा सादर करण्याची परंपरा जोपासली आहे. मागील वर्षी बर्फानी बाबा अमरनाथ शिवलिंग प्रतिकृती दर्शन सोहळा देखावा साकारला होता. यंदाच्या वर्षी याच ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये 60 बाय 85 फूट लांबी रुंदीचा केदारनाथ मंदिराप्रमाणे हुबेहू देखावा साकारला आहे.
advertisement
केदारनाथ मंदिराचा देखावा
बीड जिल्हात गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. बीड शहरातील पेठ बीड भागामध्ये गणेश मंडळांनी विविध मंदिरांच्या प्रतिकृती तसेच इतिहासकालीन देखावे साकारले आहेत. न्यू राजा गणेश मित्र मंडळाने यंदा उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आता भाविकांचे केदारनाथ दर्शन बीडमध्येच होत आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.
advertisement
चार टप्प्यात घेता येणार दर्शन
यामध्ये प्रामुख्याने चार टप्प्यांमध्ये गणेश भक्तांना केदारनाथचे दर्शन घेता येणार आहे. भक्तांना 25 बाय 30 आकाराच्या आधी योगी प्रतिकृतीच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मागील एक महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर येथील पाच शिल्पकार, दहा पेंटर आणि इतर 15 मंडळ सदस्य असे एकूण 55 पेक्षा अधिक लोकांच्या प्रयत्नातून या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. यासाठी जवळपास 13 लाख रुपये इतका खर्च आल्याची माहिती मंडळातील सदस्यांनी दिली आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
September 24, 2023 12:48 PM IST