चांद्रयान 3 चं लँडींग कसं झालं? बीडकरांना अनुभवता येणार तो थरार, Video

Last Updated:

गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून विविध देखावे सादर केले जातात. बीडमधील आनंद गणेश मंडळाचा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.

+
चांद्रयान

चांद्रयान 3 चं लँडींग कसं झालं? बीडकरांना अनुभवता येणार तो थरार, Video

बीड, 21 सप्टेंबर: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया! बाप्पाचा हा जयघोष आता गल्लोगल्ली आणि घराघरांत ऐकायला मिळत आहे. वर्षभर बाप्पाच्या आगमनाची वाट पाहिल्यानंतर अखेर 19 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात भाविकांनी जल्लोषात स्वागत केलं. संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाचा हा उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक आणि हटके डेकोरेशन. बीडमधील गणपती मंडळ वेगवेगळ्या विषयांनुसार बाप्पाच्या मूर्तीभोवती सजावट करतात.
गणेश मंडळाचे देखावे
सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध प्रकारचे देखावे याच गणेशोत्सवांच्या दहा दिवसात साकारत असतं. बीड जिल्ह्यात देखील एक असे गणेश मंडळ आहे की ते मागील एक-दोन नव्हे तर तब्बल 35 वर्षांपासून दरवर्षी नवनवीन देखावे सादर करते. गणपतीच्या उत्सव काळामध्ये विविध विषयांना किंवा चालू वर्षातील घडामोडींवर देखावा सादर केला जातो. हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गणेश भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात.
advertisement
झेंडा चौक गणेश मंडळाचा उपक्रम
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात झेंडा चौक परिसरात 1978 रोजी आनंद गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस पासून ते आत्तापर्यंत त्यांनी विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. यंदा चांद्रयान 3 चे भारताने यशस्वी उड्डाण केल्याबद्दल गणेश मंडळाने चांद्रयानचा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे हा देखावा घरगुती वस्तूंपासून तयार केला आहे.
advertisement
गणपती मंडळाच्या सर्व सदस्यांनी हा देखावा तयार करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपूर्वी तयारीला सुरुवात केली. हा देखावा बनवण्यासाठी कापूस वापरलेले खपट यासह घरगुती पद्धतीने तयार केलेले विविध प्रकारचे कलर यांचा वापर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी विविध आकर्षक अशी रंगाची लाइटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तांना हा देखावा अधिकच आकर्षित करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
चांद्रयान 3 चं लँडींग कसं झालं? बीडकरांना अनुभवता येणार तो थरार, Video
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement