गणपती बाप्पाला 21 दुर्वाच का वाहतात? जाणून घ्या कारण

Last Updated:

गणपती बाप्पाच्या पूजेवेळी दुर्वा वाहण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दुर्वा का वाहतात याबद्दल सविस्तर माहिती इथं पाहा.

+
गणपती

गणपती बाप्पाला 21 दुर्वाच का वाहतात? जाणून घ्या कारण

छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर : नुकतंच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंद आणि उत्सवाचं वातावरण आहे. सर्व गणांचा अधिपती म्हणजे गणपती. त्यामुळे हिंदू धर्मात सर्वच कार्यांची सुरुवात ही गणेश पूजनाने होते. गणेश पूजा करताना गणरायाला दुर्वांची जुडी वाहतात. कारण गणपतीला दुर्वा या अतिशय प्रिय असल्याचं सांगितलं जातं. पण त्यामागे नेमकं कारण काय आहे हे छत्रपती संभाजीनगर येथील अनंत पांडव गुरुजी यांनी सांगिलंय.
गणपतीला दुर्वा का अर्पण करतात?
गणपती बाप्पाला पूजा केल्यावर सर्वजण दुर्वा अर्पण करतात. पण बाप्पाला दुर्वाच का अर्पण केल्या जातात याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा भगवान महादेवांनी गणपती बाप्पाचा शिर धडा वेगळं केलं त्यानंतर बाप्पाला हत्तीचं शिर बसवण्यात आलं. तेव्हा बाप्पाच्या शरीराचा दाह होऊ लागला. हा दाह क्षमण करण्यासाठी सर्व देव आणि राक्षसांनी मिळून गणपती बाप्पाच्या डोक्यावरती दुर्वा अर्पण केल्या. त्यानंतर बाप्पाच्या शरीराचा दाह क्षमन झाला, असं पांडव गुरुजी सांगतात.
advertisement
आणखी एक आख्यायिका
जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा अमृत कोण घेणार यावरून वाद सुरू होता. तेव्हा ते अमृत जमिनीवर पडलं आणि तिथे हरळी किंवा दुर्वा होत्या. तेव्हापासून या दुर्वा अमृतमय झाल्यात आणि दुर्वांना महत्त्व प्राप्त झालं. तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. म्हणून आपण बाप्पाला तीन पानं असलेली दुर्वा अर्पण करतो, असं पांडव गुरुजी सांगतात.
advertisement
21 दुर्वाच का?
गणपतीला 21 दुर्वा वाहतात. त्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. अनल म्हणजे अग्नी होय. देवांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. गणपतीच्या पोटात दाह होऊ लागला. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. तर कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातील ही न थांबलेली जळजळ कमी झाली. तेव्हा यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे बाप्पा म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
मराठी बातम्या/अध्यात्म/
गणपती बाप्पाला 21 दुर्वाच का वाहतात? जाणून घ्या कारण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement