129 वर्ष जुन्या गणेशोत्सवास कल्याणमध्ये थाटात सुरूवात, लोकमान्य टिळकांशी आहे जवळचा संबंध

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचं गाव असलेल्या कल्याण शहराला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे.

+
News18

News18

कल्याण, 21 सप्टेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचं गाव असलेल्या कल्याण शहराला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील ऐतिहासिक सुभेदार वाडा कट्ट्यावर विराजमान झालेल्या बाप्पाचं हे 129 वं वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या मंडळातील बाप्पाचं दर्शन स्वत: टिळकांनीही घेतलं होतं.
कशी झाली सुरूवात?
पुण्यात 1893 साली सुरू झालेला गणेशोत्सव बापूसाहेब फडके यांनी पाहिला होता. त्यानंतर त्यांनी कल्याणमध्येही हा उत्सव सुरू करण्याचं ठरवलं. प्रभाकर ओक, लखूनाना फडके यांना त्यांनी याबाबत गळ घातली. चिंतामण वैद्य आणि काही मंडळींनी पुढाकार घेऊन हा उत्सव सुरू केला. त्यावेळी भाऊसाहेब बिवलकर यांच्या सुभेदार वाड्यात भरपूर जागा असल्याने हा उत्सव तेथे साजरा व्हावा असे ठरले.
advertisement
सुभेदार वाडा 1957 साली अत्यल्प दरानं एका शिक्षण संस्थेला देण्यात आला. त्यावेळी गणपती उत्सव याच वाड्यात होईल आणि शाळाही भरेल अशी अट टाकण्यात आली. त्यानुसार आज इथं शाळाही भरते आणि गणेशोत्सवही जल्लोषात साजरा होतो.
advertisement
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून 1895 साली सुभेदार वाड्यातील गणेशोत्सव सुरू झाला. दर दोन वर्षांनी येथील व्यवस्थापन बदललं जात. त्यामुळे कार्यकर्ते जोशात काम करतात. दरवर्षी समाज प्रबोधन होईल असा विषय देखाव्यासाठी हाताळला जातो. नवीन पिढीला यातून काहीतरी चांगले शिकायला मिळते.
advertisement
यंदा कोणता देखावा?
यावर्षी गीतेवर आधारित देखावा केला आहे. कृष्णाने जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा कर्माचे महत्त्व सांगितले. तुला युद्ध करावे लागते हे तुझे कर्मच आहे. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू पडतात. जेव्हा आपण अब्दुल कलाम , सिंधुताई सकपाळ, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रतन टाटा, लता मंगेशकर, एम एस धोनी , कल्पना चावला यांना बघतो त्यावेळी त्यांच्या कामाने ते मोठे झाले आहेत ते लक्षात येते. त्यामुळे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्वज्ञान आजही चपखल बसते.
advertisement
दहा दिवस असलेल्या या गणपती बाप्पा समोर गायनाचे, मुलाखतीचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर देखील येथे भरवले जाते अशी माहिती मंडळाचे सभासद प्रशांत खरे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
129 वर्ष जुन्या गणेशोत्सवास कल्याणमध्ये थाटात सुरूवात, लोकमान्य टिळकांशी आहे जवळचा संबंध
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement