advertisement

Konkan Railway : महाशिवरात्रीनिमित्ताने विशेष रेल्वे गाड्या, 'या' स्टेशनवरुन धावणार; जाणून घ्या वेळ

Last Updated:

Mahashivratri Special Train : महाशिवरात्रीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या गाड्यांचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घ्या.

CSMT to Sawantwadi Mahashivratri special train details
CSMT to Sawantwadi Mahashivratri special train details
मुंबई : प्रवाशांनो महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हीही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्या
मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे सणासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जाणून घ्या वेळापत्रक
सीएसएमटी-सावंतवाडी रोड ही विशेष गाडी तीन फेऱ्यांमध्ये धावणार आहे. ही गाडी सीएसएमटी येथून 14, 19 आणि 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुटणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड येथून याच तारखांना सायंकाळी 5.20 वाजता गाडी सुटेल. ही विशेष रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 4.05 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
advertisement
गांड्याचे थांबे कोणते असतील?
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्धा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत.
महाशिवरात्रीसाठी मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या भाविकांना या विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway : महाशिवरात्रीनिमित्ताने विशेष रेल्वे गाड्या, 'या' स्टेशनवरुन धावणार; जाणून घ्या वेळ
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement