Job Rule Change : 1 एप्रिलपासून Full and Finalचे नियम बदलले! नोकरी सोडण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हीही सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि राजीनामा देण्याच्या विचारात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 1 एप्रिल 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा एक असा नियम लागू होत आहे, जो कंपन्यांची मनमानी कायमची बंद करणार आहे.
सध्याच्या कॉर्पोरेट जगात नोकरी बदलणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण, राजीनामा दिल्यानंतर एका गोष्टीचं टेन्शन प्रत्येकालाच असतं, ते म्हणजे 'फुल अँड फायनल सेटलमेंट'. अनेकदा कंपनी सोडल्यानंतर आपला हक्काचा पगार, सुट्ट्यांचे पैसे आणि इतर थकबाकी मिळवण्यासाठी 3 ते 4 महिने वाट पाहावी लागते. कित्येकदा तर ऑफिसचे उंबरठे झिजवूनही पैसे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे नवीन नोकरी सुरू करताना आर्थिक ओढाताण होते.
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही स्वतः राजीनामा दिला असो, कंपनीने तुम्हाला कामावरून काढले असो किंवा 'ले-ऑफ' झाला असो, हा नियम सर्वांना समान लागू असेल. जर कंपनीने 48 तासांत पैसे दिले नाहीत, तर तो कायद्याचा भंग मानला जाईल. अशा वेळी तुम्ही कामगार विभागाकडे तक्रार करू शकता आणि उशिरा मिळालेल्या पैशांवर व्याजाची मागणीही करू शकता.
advertisement
1 वर्षांनंतरही मिळणार ग्रॅच्युइटी!जुना नियम सांगायचा की, ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे. पण नव्या नियमानुसार, जर तुम्ही 1 वर्ष सेवा पूर्ण केली असेल, तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठराल. विशेष म्हणजे, नोकरी सोडल्यानंतर 30 दिवसांच्या आत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणे अनिवार्य आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राजीनामा देण्यापूर्वी ही 'चेकलिस्ट' तपासा:तुमचा नोटीस पिरियड व्यवस्थित पूर्ण करा, अन्यथा कंपनी सेटलमेंटमधून नोटीस पे कापून घेऊ शकते.तुमचे गुंतवणुकीचे पुरावे (Tax Proofs) वेळेत सबमिट करा, जेणेकरून टॅक्स कापून उरलेली रक्कम अचूकपणे सेटल होईल.तुमच्या कंपनीने 1 एप्रिलपासून नवीन लेबर कोडनुसार प्रणाली अपडेट केली आहे का, याची एकदा खात्री करून घ्या.
advertisement








