फाटक्या जीन्स अन् शॉर्ट कपडे घालून गडावर येऊ नका, जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवस्थानाने मोठा निर्णय घेतला असून मंदिरात पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्र संहिता लागू करण्यात आली.
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवस्थानाने मोठा निर्णय घेतला असून मंदिरात पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्र संहिता लागू करण्यात आली. यासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत. त्यामुळेच असे कपडे न घालण्याचे नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत.
advertisement
दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय वेशभूषा केलेली चालणार आहे. त्यामुळे जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 12, 2025 4:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
फाटक्या जीन्स अन् शॉर्ट कपडे घालून गडावर येऊ नका, जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय