Hanuman Temple: कधी बघितला का? हनुमानाच्या मंदिरात नंदी, असं दृश्य असणारं महाराष्ट्रातील हे गाव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Hanuman Temple: या गावात बजरंगबली हनुमंताच्या मंदिरात आकर्षक आणि सुबक कलाकृती असलेला नंदी आपल्याला बघायला मिळतो.
अमरावती: महादेवाचे वाहन म्हणून नंदी नेहमी त्यांच्यासोबत असतो. प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या मंदिरात आपल्याला नंदी बघायला मिळतो. पण, आतापर्यंत आपण फक्त महादेवाच्या मंदिरातच नंदी बघितला. महादेवाच्या मंदिरात जाताना सर्वात आधी नंदीचे दर्शन होते आणि त्यानंतर महादेवाचे दर्शन आपल्याला घ्यावे लागते. पण, जर बजरंगबलीच्या मंदिरात देखील आपल्याला आधी नंदीचे दर्शन होत असेल तर? ही बाब आश्चर्यकारकच वाटेल ना? असे दृश्य आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या गावात. महिमापूर या गावात बजरंगबली हनुमंताच्या मंदिरात आकर्षक आणि सुबक कलाकृती असलेला नंदी आपल्याला बघायला मिळतो.
नंदीची स्थापना बजरंगबलीच्या मंदिरात का केली?
महिमापूर गावाच्या मध्यभागी एक 900 वर्ष जुनी पायविहीर आहे. त्याच विहिरीला लागून हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिरात 4 फूट लांब आणि 3 फूट उंच असा नंदी आपल्याला बघायला मिळतो. हनुमंताच्या मंदिरात नंदी स्थापित करण्यामागचे कारण काय? असे तेथील गावकऱ्यांना विचारल्यास ते सांगतात की, काही वर्षांपूर्वी पायविहिरीचे खोदकाम करत असताना त्यात हा नंदी सापडला. एकाच काळ्या दगडात हा नंदी घडविण्यात आला आहे.
advertisement
ज्यावेळी हा नंदी गावकऱ्यांना मिळाला त्यावेळी नंदीचे तोंड, शिंग, शेपूट खंडित केले गेले होते. या नंदीला व्यवस्थित रचना देऊन जवळच असलेल्या हनुमंताच्या मंदिरात या नंदीची स्थापना करण्यात आली. या नंदीसोबत शिवलिंग सुद्धा मिळाले होते. ते सुद्धा काळ्या दगडात कोरलेले आहे. ते सध्या मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आले.
advertisement
मंदिरातील या नंदीचे विशेषतः काय?
या नंदीचे विशेष म्हणजे पोळ्याला जसे बैलांना सजविले जाते अगदी त्याचप्रमाणे हा नंदी सजविण्यात आला आहे. या नंदीकडे बघून जिवंत नंदी बघत असल्याचा भास प्रत्येक बघणाऱ्याला होतो. हनुमंताच्या मंदिराजवळ असणाऱ्या पायविहिरीमध्ये अनेक अशा वस्तू सापडल्याचे गावकरी सांगतात. त्यामध्ये नंदी, शिवलिंग आणि देवाच्या मूर्ती यांचा समावेश आहे.
advertisement
हनुमंताच्या मंदिरातील या नंदीला पोळ्याला मान दिला जातो. सर्व गावकरी त्याची पूजा करतात. एकाच काळ्या दगडात आकर्षक असा हा नंदी घडवलेला आहे. विहिरीसोबतच नंदीला बघण्यासाठी देखील अनेक पर्यटक या ठिकाणी येतात, असे गावकरी सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 14, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Hanuman Temple: कधी बघितला का? हनुमानाच्या मंदिरात नंदी, असं दृश्य असणारं महाराष्ट्रातील हे गाव, Video