आंधळ्याच्या डोळ्यात घातला बिबा..., संत सखूआईची अंगावर काटा आणणारी आख्यायिका, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात गावोगावी देव देवतांची आणि संतांची मंदिरे आहेत. वर्ध्यातील पळसगाव येथे संत सखूआईचं देवस्थान आहे.
वर्धा, 12 ऑक्टोबर: महाराष्ट्रात गावोगावी देव देवतांची आणि संतांची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराशी एखादा चमत्कार किंवा आख्यायिका जोडलेली असते. असंच एक प्रसिद्ध मंदिर वर्धा जिल्ह्यातील पळसगाव (बाई) या ठिकाणी आहे. संत सखूआई यांच्या वास्तव्य असणाऱ्या या परिसरात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. सखूआईच्या भक्तीचा महिमा भाविकांकडून मोठ्या रंजकतेने सांगितला जातो. देवस्थानचे सचिव राजू आडकीने यांनी या मंदिराबाबत माहिती दिली आहे.
वर्धा जिल्ह्यातील पळसगाव (बाई) हे गाव संत सखूआईच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. याठिकाणी असलेल्या संत सखू आईच्या सत्वाला अंदाजे 150 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. श्री संत सखुबाई या पळसगाव येथील एक अवलिया संत होत्या. त्यांच्या मुखातून फक्त 'नारायण नारायण' हेच उच्चार ऐकायला यायचे .आता श्री संत सखुआईची महिमा दूरवर पर्यंत पसरली आहे. या तीर्थस्थळाला राज्यस्तरीय ब दर्जा प्राप्त झाला असून याठिकाणी संत सखूआईचं प्रसिद्ध देवस्थान आहे, असं आडकीने सांगतात.
advertisement
संत केजाजी महाराजांनी दिलेली कल्पना
संत केजाजी महाराजांनी पळसगाव येथील नंदा-मंदा नदीच्या काठावर एक पायरी रोवली आणि विठ्ठल मंदिराची उभारणी केली. तेव्हा महाराजांनी या गावात एक आदिशक्ती जन्माला येणार असल्याची भविष्यवाणी केली. त्यानुसार 1910 साली यमुनाबाई लक्ष्मणराव देवतळे यांच्या पोटी सखू आईचा जन्म झाला. गावात त्या अवलिया सारख्या फिरत होत्या.सखूआईत गावकऱ्यांना अवलीया संतत्व दिसू लागले. त्यांच्या मुखातून फक्त 'नारायण नारायण' हे शब्द निघायचे. वयाची तेरा वर्ष झाल्यानंतरही सखुबाई पिसाटपणाच्या स्वरूपात होत्या.
advertisement
सखूआईचा अंगावर काटा आणणारा चमत्कार
याच पळसगाव येथील गुलाब पिंजारी नावाचा एक आंधळा व्यक्ती होता. तो ताजुद्दीन बाबांच्या प्रसिद्ध दरबारात गेला आणि दृष्टी येण्यासाठी मागणी घालू लागला. तेव्हा ताजुद्दीन बाबांनी "तू इथे काय करतोयस?तुझ्या गावातच माझी आई आहे. तिला भक्तीने ओळख आणि तिचे पाया पड." असे सांगितले. त्यांनतर आंधळा व्यक्ती पळसगावला येऊन सखूआईची सेवा करू लागला. त्यांनतर त्याला दृष्टीलाभ झाला असल्याचं मंदिर सचिव राजू आडकीने सांगतात.
advertisement
जेव्हा आंधळा व्यक्ती सखूआईकडे दृष्टी मागण्यासाठी गेला. तेव्हा आईने बिबा कांडून त्याच्या डोळ्यात घातला. त्यानंतर त्याला दृष्टी आली, अशी आख्यायिका गावकरी संगतात. हा साक्षात्कार दूरवर पसरला. आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दुरवरून भाविकांची गर्दी होऊ लागली. भाविकांना सखूआईचे साक्षात्कार जाणवू लागले. त्यानंतर 1967 मध्ये सखूआईला स्वर्गवास झाला आणि तेव्हापासून गावात पुण्यतिथी आणि प्रकट दिन महोत्सव साजरा केला जातो.
advertisement
नवरात्री उत्सव होतो साजरा
श्री संत सखु आईच्या देवस्थानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे या ठिकाणी शेकडो अखंड ज्योती लावल्या जातात. पळसगावसह वर्धा जिल्ह्यातील अनेक गावखेड्यातील भाविक या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवतात.
advertisement
भाविकांची सखूआईवर श्रद्धा
वर्धा शहरापासून अंदाजे 45-50 किलोमीटर अंतरावर पळसगाव आहे. सखूआईच्या दर्शनासाठी विदर्भच नाही तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. गावात सखू आईच्या प्रकट दिनानिमित्त भव्य यात्रा असते. दरम्यान सर्व गावकरी एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात. वेगवेगळ्या दिंड्या, भजन मंडळी, सहभागी होतात. दहीहंडी, कीर्तन, रिंगण यासारखे कार्यक्रम होतात. श्री संत सखुबाईच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना सांगितल्याने आई त्या इच्छा पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक याठिकाणी भेटी देतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 12, 2023 11:49 AM IST
मराठी बातम्या/Temples/
आंधळ्याच्या डोळ्यात घातला बिबा..., संत सखूआईची अंगावर काटा आणणारी आख्यायिका, Video