Gurupurnima 2025: 2 किलो चांदीचा हार आणि 566 ग्रॅम सोन्याचा मुकुट, साईंच्या चरणी कुणी केला दान?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
दरवर्षी शिर्डीत तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यातच अनेक साईभक्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अनेक प्रकारचे दानधर्म करतात. अशातच एका साई भक्ताने गुरुपौर्णिमेचे औचित्य सोन्याचा मुकुट आणि चांदीचा हार साईबाबा संस्थानला अर्पण केला आहे.
अहिल्यानगर: दरवर्षी शिर्डीत तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यातच अनेक साईभक्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अनेक प्रकारचे दानधर्म करतात. अशातच एका अज्ञात साई भक्ताने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सोन्याचा मुकुट आणि चांदीचा हार साईबाबा संस्थानला अर्पण केला आहे. हे दान एका अज्ञात साई भक्ताने सुमारे 2 किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे 566 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत, संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला आहे.
गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस जो आपल्या आध्यात्मिक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे. या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण आज अनुभवायला मिळाला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी एका अज्ञात साईभक्ताने सुमारे 2 किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे 59 लाख रुपये किंमतीचा 566 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. तसेच साईबाबा संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला आहे. दान केलेल्या साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
advertisement
या दानामध्ये निस्वार्थी भक्ती, भावनांची श्रीमंती आणि गुरूप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सदर साईभक्ताचा सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग मनात श्रद्धा असेल तर गुरुला दिलेली छोटी देणगी देखील मोठ्या देणगीत रूपांतर होते.
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी, विनम्रता आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो. अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे दान प्रत्येक भक्तासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 10, 2025 10:20 PM IST
मराठी बातम्या/Temples/
Gurupurnima 2025: 2 किलो चांदीचा हार आणि 566 ग्रॅम सोन्याचा मुकुट, साईंच्या चरणी कुणी केला दान?