महाराष्ट्रातील असं ठिकाण जिथं वर्षातून फक्त अडीच दिवस होते बंदी हनुमानाचे दर्शन, 262 वर्षांची आहे परंपरा, Video

Last Updated:

या ठिकाणी बाल हनुमानाची मूर्ती फक्त अडीच दिवस भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर असते. बाकी दिवस बंदिस्त ठेवली जाते.

+
Bandi

Bandi Hanuman Belona

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
नागपूर : नागपूरमधील नरखेड तालुक्यात बेलोना गावात दर वर्षी दत्त जयंतीपासून 2 दिवस बाल हनुमानाची रथयात्रा असते. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी 3 ते 4 लाख लोक या तीन दिवसांमध्ये येऊन जातात. 262 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. नवसाला पावणारा बाल हनुमानजी म्हणून येथील ख्याती आहे, असे तेथील पुजारी सांगतात. त्याचबरोबर विशेष म्हणजे येथील बाल हनुमानाची मूर्ती ही फक्त अडीच दिवसच भक्तांना दर्शनासाठी असते. इतर दिवस त्या मूर्तीला बंदिस्त ठेवण्यात येते. कोणालाही दर्शन दिल्या जात नाही असेही येथील नागरिक सांगतात. यामागची काय आख्यायिका आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
बंदी हनुमानाची आख्यायिका काय?
याबाबत श्री बजरंगबली रथयात्रा उत्सव ट्रस्ट बेलोनाचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांना ही बाल हनुमानाची मूर्ती जमिनीतून मिळाली आहे. खूप वर्ष आधी घराला आग लागली होती. तेव्हा त्यातून आवाज येत होता, आवाजाची दिशा बघितली तर जमिनीतून आवाज येत आहे असे समजले. तेव्हा आमच्या पूर्वजांनी आवाजाच्या दिशेने खोदकाम सुरू केले. त्यातून ही बाल हनुमानाची मूर्ती मिळाली.
advertisement
मूर्तीचे दर्शन फक्त अडीच दिवस
पुढे ते सांगतात, जमिनीतून काढल्यानंतर मूर्तीला मंदिरात आणण्यात आले. हा साक्षात्कार झाला तेव्हा स्वतः हनुमानाने सांगितले की, मी अडीच दिवसाचा आहे. त्यामुळे मला फक्त वर्षातून अडीच दिवसच बाहेर ठेवा. बाकी दिवस माझे दर्शन कोणीही घेऊ शकणार नाही. बाकी दिवस मला झाकून ठेवा. म्हणून इथे बाल हनुमानाची मूर्ती झाकून ठेवल्या जाते.
advertisement
रथयात्रा घेण्याचे कारण की, जेव्हा खोदकाम केले मार्गशिष महिन्यातील दत्ताचे नवरात्र सुरू होते. त्यामुळे पूर्वजांनी हे रथयात्रेचे नियोजन केले होते. ते आताही आम्ही पार पाडत आहे. अजूनही आमच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न होतो, असे ते सांगतात.
अडीच दिवसाचे नियोजन कसे असते? 
चतुर्दशी, पौर्णिमा आणि प्रतिपदा या तीन विभागामध्ये त्याचे नियोजन झाले आहे. चतुर्दशीला रात्रीला रथ निघतो सकाळी हनुमानजी मंदिरात असतात. संध्याकाळी रथावर असतात, त्यानंतर मिरवणूक असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा रथ पूर्ण दिवस मंदिराजवळ असतो. नवस केलेलं लोकं आणि इतर भक्त येथे दर्शनासाठी येतात. दिवसभर दर्शन सुरू असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा मिरवणूक काढली जाते. कृष्ण मंदिर आणि राम मंदिर येथे गोपाळकाला होतो. त्यानंतर मंदिरातील मारोती आणि रथातील मारोती यांची भेट होते. त्यानंतर आरती करून यात्रेचा समारोप केला जातो. या तीन दिवस बेलोना गावात जणू दिवाळीचं असते, असे अध्यक्ष प्रदिप जोशी यांनी सांगितले.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातील असं ठिकाण जिथं वर्षातून फक्त अडीच दिवस होते बंदी हनुमानाचे दर्शन, 262 वर्षांची आहे परंपरा, Video
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement