Door Frame Vastu: घराची चौकट उभारण्याचे वास्तु नियम; शुभ वार-शुभ तिथी, शास्त्र जाणून घ्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार, दाराची चौकट किंवा उंबरठा कधीही भंगलेला असू नये. चौकट तुटली तर ती ताबडतोब दुरुस्त करावी. वास्तुशास्त्रानुसार, लाकडापासून बनवलेली दरवाजाची चौकट सर्वात शुभ मानली जाते.
मुंबई : प्रवेशद्वार हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, दरवाजाची चौकट देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. दाराच्या चौकटीचे काही वास्तु नियम लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, अन्यथा व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
खराब चौकट ताबडतोब बदला: उंबरठा किंवा दरवाजाची चौकट कधीही तुटलेली किंवा खराब नसावी. वास्तुशास्त्रानुसार ते चांगले मानले जात नाही. मुख्य दाराची चौकट तुटलेली असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करा. मोडक्या खुर्च्या, कचराकुंडी इत्यादी दाराच्या चौकटीजवळ ठेवू नयेत.
दरवाजाची चौकट उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. घराच्या दाराची चौकट बनवताना त्यात चांदीची तार घालावी. तसं करणं शुभ मानलं जातं.
advertisement
चौकट बसवण्यासाठी शुभ तिथी-दिवस:
शुक्ल पक्षातील 5 वा, 7 वा, 6 वा किंवा 9 वा दिवस दरवाजाची चौकट बसविण्यासाठी शुभ मानला जातो.
सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस चौकट बसवण्यासाठी शुभ मानले जातात.
प्रतिपदेला दाराची चौकट ठेवल्याने दुःख येते, तृतीयेला दाराची चौकट ठेवल्याने रोग होतो, चतुर्थीला दाराची चौकट ठेवल्याने संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो, षष्ठीला दाराची चौकट ठेवल्याने धनहानी होते. दशमी, पौर्णिमा आणि अमावस्येला दाराची चौकट लावल्यानं शत्रु वाढतात.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार, दाराची चौकट किंवा उंबरठा कधीही भंगलेला असू नये. चौकट तुटली तर ती ताबडतोब दुरुस्त करावी. वास्तुशास्त्रानुसार, लाकडापासून बनवलेली दरवाजाची चौकट सर्वात शुभ मानली जाते. लाकडी चौकट बनवायची नसेल, तर तुम्ही संगमरवरी चौकट बनवू शकता.
advertisement
घराची चौकट उभारताना शुभ मुहूर्तांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शुभ मुहूर्तावर उभारलेली चौकट घरमालकाला विशेष फायदे देते. चौकट उभारताना सूर्य नक्षत्र, शाखा चक्र, शुभ नक्षत्र, तिथी, दिवस इत्यादींचा विचार करून शुभ वेळ जाणून घ्यावी.
शुभ नक्षत्र: रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा, रेवती, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरभाद्रपदा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Door Frame Vastu: घराची चौकट उभारण्याचे वास्तु नियम; शुभ वार-शुभ तिथी, शास्त्र जाणून घ्या