Vastu Tips: बेडरुममध्ये कधीच ठेवू नयेत या गोष्टी! वाद-तणाव, संपूर्ण कुटुंबाची शांती भंग पावते

Last Updated:

Vastu Tips Marathi for Bedroom: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये काही वस्तू ठेवणे योग्य मानले जात नाही. या गोष्टी ठेवल्यानं आपल्या झोपेवर तसेच आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी बेडरूमध्ये ठेवणं चागलं मानलं जात नाही.

News18
News18
मुंबई : बेडरूम ही घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते, तिथं आपण आराम करतो, दिवसभराचा थकवा दूर होतो. बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टी आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये काही वस्तू ठेवणे योग्य मानले जात नाही. या गोष्टी ठेवल्यानं आपल्या झोपेवर तसेच आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी बेडरूमध्ये ठेवणं चागलं मानलं जात नाही.
धार्मिक पुस्तके - वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक पुस्तके बेडरूममध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, आपण गीता, कुराण, बायबल यांसारखी धार्मिक पुस्तके पूजास्थळी देव्हाऱ्यात श्रद्धेने ठेवली पाहिजेत. बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे, ही पुस्तके येथे ठेवल्याने त्यांचा अनादर होऊ शकतो.
झाडू - वास्तुशास्त्रानुसार झाडू बेडरूममध्ये ठेवू नये. झाडू स्वच्छतेशी संबंधित आहे, परंतु तो घराच्या महत्त्वाच्या ठिकाणांपासून दूर ठेवावा. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास घरात पैशाची कमतरता भासू शकते. बाहेरील व्यक्तीच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीनं झाडू ठेवावा.
advertisement
तीक्ष्ण-धारधार गोष्टी - वास्तुनुसार, बेडरूममध्ये चाकू, कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे घरात तणाव आणि भांडणे होऊ शकतात. या गोष्टी घराच्या इतर भागात ठेवाव्यात, जेणेकरून बेडरूममधील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील.
advertisement
देवतांच्या मूर्ती - वास्तुनुसार, बेडरूममध्ये देवी-देवतांच्या मूर्ती ठेवणे देखील योग्य मानले जात नाही. हे ठिकाण विश्रांतीसाठी असल्यानं पूजास्थळी मूर्ती ठेवाव्यात. बेडरूममध्ये मूर्ती ठेवल्याने धार्मिक वातावरण बिघडू शकते आणि मानसिक शांती प्रभावित होऊ शकते.
मृत व्यक्तींचे फोटो - वास्तुनुसार, बेडरूममध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. याचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि तुमची शांती भंग होऊ शकते. मृत व्यक्तीचे फोटो इतर ठिकाणी दक्षिण दिशेला लावावे, याने घराचे वातावरण सकारात्मक आणि शांत राहील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: बेडरुममध्ये कधीच ठेवू नयेत या गोष्टी! वाद-तणाव, संपूर्ण कुटुंबाची शांती भंग पावते
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement