Navratri 2023 : 400 वर्षात पहिल्यांदा असा योग, नवरात्रीचे 9 दिवस 9 शुभ मुहूर्त, असा होणार फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीमातेची आराधना केली जाते.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या, 13 ऑक्टोबर : सनातन हिंदू धर्मात शुभ मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. कोणतेही मंगलकार्य, शुभकार्य करताना शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्त दरम्यान केलेले कार्य अनंत फलदायी असते, असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यामध्ये 9 शुभ योगदेखील तयार होत आहेत.
ज्योतिषांच्या मते, मागील 400 वर्षांपासून असा शुभ योगायोग नवरात्रोत्सवात आला नव्हता. त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रोत्सवात 9 दिवसांचा प्रत्येक दिवस शुभ आहे. या 9 दिवसांमध्ये तुम्हाला नवीन व्यवसाय, नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर ते सर्वात शुभ राहील.
advertisement
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीमातेची आराधना केली जाते. या वेळी रविवारपासून नवरात्री सुरू होत आहे. माता राणी हत्तीवर स्वार होऊन अनेक शुभ संकेत देत आहे. याबाबत अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितले की, यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये तीन सर्वार्थ सिद्धी योग, तीन रवियोग आणि एक त्रिपुष्कर योगही तयार होत आहे. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात वाहन किंवा चारचाकी खरेदी करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, असे त्यांनी सांगितले.
advertisement
⦁ 15 ऑक्टोबरला पद्म योग आणि बुधादित्य योग तयार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही या दिवशी चित्रा नक्षत्र असल्याने तिथे खरेदी करता येते. आपण भागीदारीसह नवीन आयुष्य सुरू करू शकता.
⦁ 16 ऑक्टोबरला छत्र योगासह स्वाती नक्षत्र आणि भद्रा तिथीचा योग तयार होत आहे. अशा स्थितीत यावेळी मोबाइल आणि लॅपटॉपच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त राहील.
advertisement
⦁ 17 ऑक्टोबरला प्रीति, आयुष्मान आणि श्रीवत्स योग तयार होत आहे. यादिवशी इलेक्ट्रॉनिक सामान आणि मोबाइल खरेदी करू शकतात.
⦁ 18 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धिचा निर्माण होत आहे. यादिवशी वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे.
⦁ 19 ऑक्टोबरला जेष्ठा नक्षत्र आणि पूर्ण तिथीचा योग तयार होत आहे. यादिवशी मालमपत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे.
advertisement
⦁ 20 ऑक्टोबरला रवि योगासह षष्ठी तिथी आणि मूल नक्षत्रचा योग तयार होत आहे. यादिवशी मालमत्ता खरेदी आणि मशीनरी पार्टची खरेदीसाठी खूप चांगली वेळ आहे.
⦁ 21 ऑक्टोबरला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. यादिवशी गुंतवणूक आणि नवीन सुरुवात केल्याने तीनपट फायदा होईल.
⦁ 22 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग तयार होत आहे. या दिवशी कंस्ट्रक्शनच्या कामांसाठी खूप चांगली वेळ आहे.
advertisement
⦁ 23 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहे. यादिवशी काहीही खरेदी करू शकता.
(सूचना: इथे दिलेली माहिती ही ज्योतिषांच्या आधारावर आहे. news18 याची कोणतीही पुष्टी करत नाही)
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
October 13, 2023 12:19 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2023 : 400 वर्षात पहिल्यांदा असा योग, नवरात्रीचे 9 दिवस 9 शुभ मुहूर्त, असा होणार फायदा