Vivah Muhurat 2024: घाई करा मंडळी.. 71 पैकी उरले 18! दिवाळीनंतर लग्नाचे शुभ मुहूर्त कधी? पहा अचूक तारखा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
November-December 2024 Vivah Muhurat : ज्योतिषांच्या मते शुभ मुहूर्ताशिवाय लग्न करणे अशुभ मानले जाते. यावर्षी लग्नासाठी एकूण 71 शुभ मुहूर्तांपैकी आता फक्त 18 उरले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळतील.
November-December 2024 Vivah Muhurat : 2024 मध्ये पितृपक्षानंतर नवरात्रीचा काळ सुरू आहे. विविध शुभ कार्येही होऊ लागली आहेत. नोव्हेंबर महिन्यात देवउठनी एकादशी येत असल्यानं लग्नसराई सुरू होईल. यंदा 12 नोव्हेंबर 2024 रोजी तुळशी विवाह म्हणजेच देवउठनी एकादशी आहे. लग्न विधींसाठी शुभ मुहूर्ताला सर्वात जास्त महत्त्व असते. ज्योतिषांच्या मते शुभ मुहूर्ताशिवाय लग्न करणे अशुभ मानले जाते. यावर्षी लग्नासाठी एकूण 71 शुभ मुहूर्तांपैकी आता फक्त 18 उरले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळतील. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांनी न्यूज18 ला याबाबत माहिती दिली आहे.
2024 मध्ये एकूण 71 शुभ मुहूर्त -
2024 मध्ये लग्नासाठी एकूण 71 शुभ मुहूर्त होते. आता फक्त 18 शुभ मुहूर्त शिल्लक आहेत. ज्योतिषांच्या मते या तारखांना लग्न करणे खूप शुभ मानले जाते.
नोव्हेंबर-डिसेंबरच्या शुभ तारखा -
चातुर्मासामुळे 17 जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत विवाहासारख्या शुभ कार्यांना मुहूर्त नव्हते. आता नोव्हेंबरचा पहिला मुहूर्त 12 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी असेल. यानंतर संपूर्ण नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी एकामागून एक शुभ मुहूर्त येतील.
advertisement
नोव्हेंबरमधील लग्नाचे शुभ मुहूर्त -
नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी काही तारखा खूप शुभ आहेत. यामध्ये 12, 16, 17, 18, 22, 23, 24, 25, 28 आणि 29 नोव्हेंबर लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. या शुभ तारखांना लग्न करणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहते, असे मानले जाते.
advertisement
डिसेंबरचे शुभ मुहूर्त -
डिसेंबर महिन्यात लग्नासाठी काही शुभ मुहूर्त आहेत. यामध्ये 03, 04, 05, 09, 10, 11, 13 आणि 14 डिसेंबरचा समावेश आहे. ज्या लोकांचे लग्न या शुभ तिथींवर होते ते नेहमी आनंदी राहू शकतील.
नोव्हेंबर-डिसेंबरच्या या तारखा सर्वोत्तम -
ज्योतिषांच्या मते 22 आणि 23 नोव्हेंबर या तारखा लग्नासाठी उत्तम आहेत. 9 आणि 10 डिसेंबर या तारखा देखील लग्नासाठी सर्वोत्तम आहेत. या तारखांना दिवस आणि रात्रभर शुभ मुहूर्त असतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 09, 2024 9:31 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vivah Muhurat 2024: घाई करा मंडळी.. 71 पैकी उरले 18! दिवाळीनंतर लग्नाचे शुभ मुहूर्त कधी? पहा अचूक तारखा






