Ram Mandir - राम मंदिरात सर्वसामान्यांना कधी मिळणार एंट्री, दर्शनासाठी खरंच पैसे द्यावे लागतील का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह देशातील आणि जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पण यादिवशी सर्वसामान्यांना मात्र नो एंट्री आहे.
नवी दिल्ली : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह देशातील आणि जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पण यादिवशी सर्वसामान्यांना मात्र नो एंट्री आहे. सर्वसामान्यांसाठी हे मंदिर कधी खुलं होणार, इथं दर्शनासाठी पैसे द्यावे लागणार का? राममंदिराबाबत अशाच काही प्रश्नंची उत्तरं.
राम मंदिराचं व्यवस्थापन श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने या ट्रस्टची स्थापना केली. मंदिराच्या बांधकामावरही ट्रस्ट लक्ष ठेवून आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 22 जानेवारी रोजी सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
अभिषेक झाल्यानंतर राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले केलं जाईल. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर सकाळी 7:00 ते 11:30 आणि त्यानंतर दुपारी 2:00 ते 7:00 या वेळेत सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी खुले असेल. दुपारी सुमारे अडीच तास मंदिर आनंद आणि विश्रांतीसाठी बंद राहणार आहे.
advertisement
राम मंदिरात दिवसातून तीन वेळा रामललाची आरती केली जाते. प्रथम - सकाळी 6:30 वाजता, ज्याला जागरण किंवा शृंगार आरती म्हणतात. दुसरी - दुपारी 12:00 वाजता ज्याला भोग आरती म्हणतात आणि तिसरी 7:30 वाजता संध्या आरती म्हणतात. अयोध्येच्या राम मंदिरातील आरतीला उपस्थित राहण्यासाठी श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पास घेतला जाऊ शकतो. पाससाठी वैध ओळखपत्र (आयडी प्रूफ) असणे आवश्यक आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार एका वेळी फक्त 30 लोकच आरतीमध्ये सहभागी होऊ शकतील.
advertisement
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन मोफत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. पण आरतीसाठीपास घेणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच आरतीमध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल.
Location :
Delhi
First Published :
January 21, 2024 3:53 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir - राम मंदिरात सर्वसामान्यांना कधी मिळणार एंट्री, दर्शनासाठी खरंच पैसे द्यावे लागतील का?