फक्त भारत-पाकिस्तान नाही, तर... टीम इंडिया आणखी कुणाविरुद्ध खेळणार? आशिया कपचं पूर्ण टाईम टेबल
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. आशिया कपसाठी भारतीय खेळाडू युएईमध्ये पोहोचले आहेत.
मुंबई : महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. आशिया कपसाठी भारतीय खेळाडू युएईमध्ये पोहोचले आहेत. 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे, तर 28 सप्टेंबरला स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 19 मॅच खेळवल्या जातील. आशिया कपमध्ये चाहत्यांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्यावर लागलं असलं, तरी एकूण 8 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
आशिया कपमध्ये सहभागी झालेल्या 8 टीमना ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान या चार टीम आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानशिवाय युएई आणि ओमानविरुद्ध खेळावं लागणार आहे. तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. ग्रुप ए आणि ग्रुप बी मधल्या टॉप-2 टीम सुपर-4 मध्ये जाणार आहेत, त्यामुळे सुपर-4 मध्येही भारत-पाकिस्तान सामना व्हायची शक्यता आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळवणाऱ्या टॉप-2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.
advertisement
ग्रुप ए मधल्या टीम
भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान
ग्रुप बी मधल्या टीम
श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग
किती वाजता सुरू होणार मॅच?
आशिया कपच्या सर्व मॅच या अबु धाबी आणि दुबईमध्ये होणार आहेत. भारतीय वेळेनुसार या मॅच रात्री 8 वाजता सुरू होतील.
कुठे पाहता येणार मॅच?
आशिया कपच्या मॅच या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. याशिवाय सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर केलं जाणार आहे.
advertisement
आशिया कपचं वेळापत्रक
9 सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर- भारत विरुद्ध युएई
11 सप्टेंबर- बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर- बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर- युएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर- बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध युएई
advertisement
18 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर- भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 स्टेज
20 सप्टेंबर- B1 विरुद्ध B2
21 सप्टेंबर- A1 विरुद्ध A2
23 सप्टेंबर- A2 विरुद्ध B1
24 सप्टेंबर- A1 विरुद्ध B2
25 सप्टेंबर- A2 विरुद्ध B2
26 सप्टेंबर- A1 विरुद्ध B1
28 सप्टेंबर- फायनल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फक्त भारत-पाकिस्तान नाही, तर... टीम इंडिया आणखी कुणाविरुद्ध खेळणार? आशिया कपचं पूर्ण टाईम टेबल