Australia : टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 'धक्क्यावर धक्के', 126 वर्षानंतर इतिहास रचण्याची संधी गमावली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia Cricket Team Olympic qualification : विशेषतः 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील सहभागावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ऑस्ट्रेलियन बोर्डाची चिंता वाढली आहे.
Australia cricket Olympics : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण जात आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसलाय. या खराब प्रदर्शनाचा परिणाम आता केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नसून, भविष्यातील मोठ्या संधींवरही होताना दिसत आहे. विशेषतः 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील सहभागावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ऑस्ट्रेलियन बोर्डाची चिंता वाढली आहे.
2009 नंतर पहिल्यांदाच असं घडलं
या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. प्रथम झिम्बाब्वेने त्यांना पराभूत केले आणि त्यानंतर श्रीलंका टीमनेही ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. सुपर-8 मध्ये पोहोचण्याच्या थोड्याफार आशा शिल्लक होत्या, मात्र आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली आणि ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन टीम पहिल्याच राउंडमधून बाहेर पडली असून, यामुळे त्यांच्या आयसीसी रँकिंगवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
जर न्यूझीलंडने सेमीफायनलपर्यंत मजल मारली तर....
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये पुरुषांच्या टी20 क्रिकेटसाठी केवळ 6 टीम्स निवडल्या जाणार आहेत. या टीम्सची निवड महाद्वीपीय क्वालिफिकेशन सिस्टम किंवा आयसीसी रँकिंगच्या आधारावर होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची रँकिंग न्यूझीलंडपेक्षा चांगली होती. मात्र, आता लवकर बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडकडे ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची मोठी संधी आहे. जर न्यूझीलंडने या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत मजल मारली, तर ते ऑलिम्पिकसाठी थेट क्वालिफाय करू शकतात.
advertisement
क्रिकेट विश्वासाठी मोठी गोष्ट
जर न्यूझीलंड रँकिंगमध्ये पुढे गेला, तर ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिकमधील शेवटच्या एका जागेसाठी इतर दुसऱ्या क्रमांकाच्या टीम्ससोबत वेगळी क्वालिफिकेशन टूर्नामेंट खेळावी लागेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी हा एक मोठा वैयक्तिक धक्का ठरू शकतो, कारण क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. 1900 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट परतत असताना, ऑस्ट्रेलियासारखी मोठी टीम त्यातून बाहेर राहणे ही क्रिकेट विश्वासाठी मोठी गोष्ट असेल.
advertisement
दिग्गज खेळाडू ऑलिम्पिकसाठी उत्सुक
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. स्टीव्ह स्मिथने अलीकडेच सांगितले होते की, ऑलिम्पिक टीमचा भाग बनणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. कॅप्टन पॅट कमिन्सने देखील ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान असल्याचे म्हटले होते. आता या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 7:23 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Australia : टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 'धक्क्यावर धक्के', 126 वर्षानंतर इतिहास रचण्याची संधी गमावली?







