BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बॉम्ब फोडणार, विराट-रोहित ए प्लसमधून बाहेर! गिलचं प्रमोशन होणार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिलचं प्रमोशन होणार आहे. गिलचा पगार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बरोबरीचा असू शकतो.
मुंबई : भारताचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिलचं प्रमोशन होणार आहे. गिलचा पगार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बरोबरीचा असू शकतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय जेव्हा त्यांचं पुढील सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करेल तेव्हा गिलला ए+ श्रेणीत स्थान मिळू शकते.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिका 19 डिसेंबर रोजी संपेल. इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, टी20 मालिका संपल्यानंतर बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) 22 डिसेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत शुभमन गिलच्या प्रमोशनचा निर्णय होऊ शकतो. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना केंद्रीय करारात समाविष्ट करावे की नाही हे देखील या बैठकीत ठरवता येईल, कारण ते आता फक्त वनडे क्रिकेट खेळतात.
advertisement
गेल्या वर्षी, केंद्रीय करार यादीच्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त चार खेळाडूंचा समावेश होता. हे चार खेळाडू म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा. ग्रेड ए+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये पगार मिळतो. ए+ मधल्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्त झाले आहेत, त्यामुळे या दोघांना कोणत्या ग्रेडमध्ये ठेवायचं? याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागणार आहे.
advertisement
बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतील ग्रेड ए+ मधील खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मधील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळतो. ग्रेड बी मधील खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी रुपये मिळतात आणि ग्रेड सी मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात.
शुभमन गिल सध्या ग्रेड ए मध्ये येतो, म्हणून आतापर्यंत त्याला वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळत होता. गिल हा भारताच्या टी20 आणि टेस्ट टीमचा कर्णधार आहे, तसंच त्याला टी-20 टीमचा उपकर्णधारही करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बॉम्ब फोडणार, विराट-रोहित ए प्लसमधून बाहेर! गिलचं प्रमोशन होणार










