Bhuvneshwar Kumar : 36 वर्षाच्या भूवीने रचला इतिहास, 'डबल सेंच्युरी' पूर्ण झाल्यावर सांगितलं, एका गोष्टीची वाटली होती भीती!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bhuvneshwar Kumar Reaction On 200 wickets : अनेक वर्षांपासून केलेल्या कष्टाचं फळ मिळतं तेव्हा खरोखरच खूप आनंद होतो. ही खेळपट्टी बॅटर्ससाठी थोडी आव्हानात्मक होती, असं मत भुवनेश्वर कुमारने मांडलं आहे.
Bhuvneshwar kumar create history : आरसीबीने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजयी परंपरा कायम ठेवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भुवनेश्वर कुमारने चेन्नईच्या मॅचमध्ये मोठा किर्तीमान रचलाय. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमधील 200 विकेट्स पूर्ण केल्या. अशी कामगिरी करताना तो पहिला पेसर आणि दुसरा बॉलर ठरला आहे. आपल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मला कष्टाचं फळ मिळतं - भुवनेश्वर कुमार
200 विकेट घेण्याचा किर्तीमान रचल्यानंतर भूवनेश्वर कुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक वर्षांपासून केलेल्या कष्टाचं फळ मिळतं तेव्हा खरोखरच खूप आनंद होतो. ही खेळपट्टी बॅटर्ससाठी थोडी आव्हानात्मक होती, असं मत भुवनेश्वर कुमारने मांडलं आहे. टिम डेव्हिडची बॅटिंग पाहिल्यानंतर मी गोंधळून गेलो होतो की, मी आनंदी व्हावं की दु:खी व्हावं कळलं नाही. कारण त्यानंतर बॉलिंग आम्हाला करायची होती, असं म्हणत भुवीने आपली भावना व्यक्त केली.
advertisement
माझी रणनीती अगदी साधी ठेवली -भुवनेश्वर कुमार
मला क्रॅम्प्स येत असल्यामुळे मी माझी रणनीती अगदी साधी ठेवली. अचूक टप्प्यावर बॉलिंग करणे हाच माझा प्रयत्न होता आणि त्याचा फायदा झाला, असं भुवनेश्वर कुमार म्हणाला. चिन्नस्वामी सारख्या मैदानात रन्सचा बचाव करणं सोपं नसतं, पण टीम मीटिंगमध्ये ठरवल्याप्रमाणे आम्ही नियोजन अंमलात आणलं. आम्ही ज्या पद्धतीने सराव करत आहोत, त्याचे रिझल्ट्स आता मैदानावर दिसून येत आहेत, जे टीमसाठी खूप चांगलं असल्याचं भुवी म्हणाला.
advertisement
Bhuvneshwar Kumar said, “after watching Tim David’s knock I was confused that I should be happy or be worried because we were bowling next”. pic.twitter.com/8UU0U3usuK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 5, 2026
यझुवेंद्र चहल सर्वात टॉपवर
advertisement
दरम्यान, भुवीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एक विशेष डबल सेंच्युरी पूर्ण केली. भुवीने आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेतले आहेत. भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आयुष म्हात्रेला एक रनवर आऊट केलं. यासह त्याने 200 विकेट पूर्ण केले आहेत. त्याआधी पंजाब किंग्जचा यझुवेंद्र चहल सर्वात टॉपवर आहे. त्याने आत्तापर्यंत 224 विकेट्स नावावर केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Bhuvneshwar Kumar : 36 वर्षाच्या भूवीने रचला इतिहास, 'डबल सेंच्युरी' पूर्ण झाल्यावर सांगितलं, एका गोष्टीची वाटली होती भीती!








