IND vs PAK : 'देशापेक्षा मोठं काहीही नाही...', गब्बरने शड्डू ठोकून सांगितलं 'पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये आम्ही...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shikhar Dhawan On IND vs PAK WCL : माजी भारतीय सलामीवीर शिखर धवनने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता सामना रद्द करण्यात आलाय.
World Championship of Legends : पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) संघ आमने सामने येणार होते. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड या स्पर्धेमध्ये शिखर धवन, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग यांसारखे लिजेंड खेळाडू खेळणार होते. मात्र, आता भारतीय खेळाडूंनी कुडघोडी करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, असा निर्णय भारतीय खेळाडूंनी घेतल्यानंतर अखेर सामना रद्द करावा लागला आहे. तर दुसरीकडे शिखर धवन याने पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
धवन म्हणतो 'पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही'
शिखर धवनने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचेसमध्ये भाग न घेण्याचा निर्णय स्पष्ट केला. यामागे एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे प्रमुख कारण असल्याचं त्याने नमूद केलं. धवनसोबतच हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युसूफ पठाण यांसारख्या इतर भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानविरुद्धची मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
देशापेक्षा मोठे काहीही नाही - शिखर धवन
शिखर धवनने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे की, "मी 11 मे रोजी उचललेल्या पावलावर अजूनही ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि माझ्या देशापेक्षा मोठे काहीही नाही." भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं धवन आणि त्याच्या टीमने कळवलं आहे. त्यानंतर आता सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
Jo kadam 11 May ko liya, uspe aaj bhi waise hi khada hoon. Mera desh mere liye sab kuch hai, aur desh se badhkar kuch nahi hota.
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/gLCwEXcrnR
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 19, 2025
advertisement
India vs Pakistan called off, going by the release sent by WCL it seems continuing the league without Pakistan team is the best & most feasible option for them. From IND organisers to players, they thought they will go ahead with this & no one will notice but that wasn’t the case pic.twitter.com/UnhKFaN3U4
— Manoj Dimri (@manoj_dimri) July 20, 2025
advertisement
मॅच अधिकृतपणे रद्द
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे WCL आयोजकांनी भारत-पाकिस्तान मॅच अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यांनी चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि भारतीय लेजेंड्सनाही अस्वस्थता जाणवली. या पार्श्वभूमीवर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2025 7:55 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'देशापेक्षा मोठं काहीही नाही...', गब्बरने शड्डू ठोकून सांगितलं 'पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये आम्ही...'