Harbhajan Singh : हरभजन इस्लाम स्वीकारणार होता? इंझमामवर भडकला भज्जी; म्हणाला, ही कोणती नशा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
हरभजन सिंगने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या इंझमाम उल हकच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.
मुंबई, 15 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी कर्णधारर इंझमाम उल हकवर संताप व्यक्त केला आहे. इंझमाम उल हकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो बोलतो की एकदा हरभजनने मौलाना तारिक जमील यांच्यामुळे प्रभावित होत इस्लाम स्वीकारण्याचा विचार केला होता. आता हरभजन सिंगने या वक्तव्याचा समाचार घेतला असून साफ खोटं असल्याचं म्हटलं. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे असंही हरभजनने सुनावलं.
व्हिडीओमध्ये इंझमाम उल हक म्हणतो की, आमच्याकडे एक खोली होती जिथे प्रार्थना केली जायची. मौलाना तारिक जमील सायंकाळी आम्हाला भेटायला यायचे आणि नमाज शिकवायचे. काही दिवसांनी इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि जहीर खानही यायला लागले. चार इतर भारतीय क्रिकेटर बसले आणि आम्ही बघतच राहिले. हरभजनला तारिक जमील हे मौलाना असल्याचं माहिती नव्हतं. तेव्हा हरभजनने म्हटलं होतं की मी यामुळे प्रभावित झालो आणि मला त्यांच्या शिकवणीचं पालन करायची इच्छा आहे.
advertisement
हरभजन सिंगने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या इंझमाम उल हकच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय. हरभजनने म्हटलं की, ही कुठली नशा, काय पिऊन बोलत आहे? मी भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शीख असल्याचाही अभिमान आहे. हे बकवास लोक काहीही बरळतात.
Yeh kon sa nasha pee kar baat kar raha hai ? I am a proud Indian and proud Sikh..yeh Bakwaas log kuch bi bakte hai https://t.co/eo6LN5SmWk
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 14, 2023
advertisement
पाकिस्तानचा क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या कामगिरीवर टीका करताना ऐश्वर्या रायचं उदाहरण चुकीच्या पद्धतीने दिलं होतं. यावरून सध्या सोशल मीडियावर अब्दुल रज्जाकवर टीका केली जातेय. त्यातच आता पुन्हा इंझमाम उल हकचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याच्यावरही टीकेचा भडिमार केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2023 1:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Harbhajan Singh : हरभजन इस्लाम स्वीकारणार होता? इंझमामवर भडकला भज्जी; म्हणाला, ही कोणती नशा