ऑस्ट्रेलियामध्ये मला जेवणातून विष देण्यात आले; खेळाडूच्या दाव्याने एकच खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Novak Djokovic Latest News : सर्बिया टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने एक खळबळजनक दावा केला आहे. 2022 साली ऑस्ट्रेलियात असताना आपल्याला जेवणातून विष देण्यात आल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.
नवी दिल्ली: सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दावा केला आहे की 2022 मध्ये मेलबर्नमध्ये असताना त्यांच्या जेवणात विष मिसळून देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 दरम्यान मेलबर्नमध्ये त्यांच्यासोबत ही घटना घडली होती. त्यावेळी त्यांनी कोविड-19 लसीकरण करून घेण्यास नकार दिला होता, ज्यामुळे नोव्हाकला देश सोडण्यासही सांगितले गेले होते.
37 वर्षीय जोकोविच यांनी गुरुवारी एका मुलाखतीत सांगितले की, त्या वेळी मला काही आरोग्यविषयक समस्या होत्या आणि मला जाणवले की मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये मला काहीतरी विषारी पदार्थ खायला दिले गेले होते. जेव्हा मी सर्बियामध्ये परतलो, तेव्हा मला समजले की माझ्या शरीरात पारा (Mercury) आणि शिसे (Lead) खूप जास्त प्रमाणात होते. मी ही गोष्ट कधीच कोणाला सांगितली नव्हती, पण आता याची मला खात्री झाली आहे.
advertisement
90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या सुब्रह्मण्यन यांना किती पगार मिळतो?
नोव्हाकच्या या दाव्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोपनीयतेच्या कारणास्तव मी या प्रकरणांवर भाष्य करू शकत नाही. दरम्यान सरकारचे म्हणणे आहे की, ज्या पार्क हॉटेलमध्ये नोव्हाकला ठेवण्यात आले होते, तिथे प्रत्येकाला ताजे शिजवलेले लंच आणि डिनर दिले जात होते.
advertisement
हॉटेलमध्ये नोव्हाकला का ठेवण्यात आले होते?
नोव्हाकला हॉटेलमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते कारण ऑस्ट्रेलिया थांबण्यासाठी त्याची कायदेशीर लढाई लढत होते. नोव्हाकने कोविड-19 चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. नोव्हाकला हॉटेलमध्ये ब्रेड, नूडल्स, चहा आणि कॉफी यासारख्या नाश्त्याचे पदार्थ दिले जात होते. मात्र, त्यामध्ये विष होते की नाही हे तिथले अधिकारीच सांगू शकतील, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.
advertisement
आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले
सर्बियाच्या नोव्हाकच्या नावावर २४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे. पुरुषांच्या टेनिसमध्ये तो १३ वेगवेगळ्या वर्षात विक्रमी ४२८ आठवडे अव्वल स्थानी होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2025 6:25 PM IST