IND vs NZ : मोठ्या घोडचुकीमुळे 'प्रसिद्ध' झाला कृष्णा, टीम इंडियाच्या 10 खेळाडूंनी लावला डोक्याला हात!

Last Updated:

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगनंतर बॉलिंगही अपयशी ठरली आहे. 285 रनचं आव्हान वाचवत असताना टीम इंडियाची फिल्डिंगही निराशाजनक झाली आहे.

मोठ्या घोडचुकीमुळे 'प्रसिद्ध' झाला कृष्णा, टीम इंडियाच्या 10 खेळाडूंनी लावला डोक्याला हात!
मोठ्या घोडचुकीमुळे 'प्रसिद्ध' झाला कृष्णा, टीम इंडियाच्या 10 खेळाडूंनी लावला डोक्याला हात!
राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगनंतर बॉलिंगही अपयशी ठरली आहे. 285 रनचं आव्हान वाचवत असताना टीम इंडियाची फिल्डिंगही निराशाजनक झाली आहे. प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याचा अगदी सोपा कॅच सोडला. डॅरेल मिचेल 80 रनवर असताना कृष्णाने ही चूक केली. प्रसिद्ध कृष्णाने दिलेल्या या जीवनदानाचा मिचेलने फायदा उचलला आणि त्याचं शतक पूर्ण केलं. डॅरेल मिचेलचं हे वनडे क्रिकेटमधलं हे 8 वे शतक होते. डॅरेल मिचेलने 117 बॉलमध्ये नाबाद 131 रन केले. मिचेलच्या या शतकामुळे न्यूझीलंडचा 7 विकेटने विजय झाला आहे. याचसोबत न्यूझीलंडने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.
36 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला कुलदीप यादवच्या बॉलिंगवर डॅरेल मिचेलने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा शॉट मारला त्यामुळे बॉल हवेत गेला. लॉन्ग ऑनवर उभा असलेला प्रसिद्ध कृष्णा कॅच पकडण्यासाठी आला, पण अत्यंत सोपा असा कॅच पकडण्यात कृष्णाला अपयश आलं. कृष्णाने कॅच सोडल्यानंतर टीम इंडियाच्या मैदानातल्या इतर 10 खेळाडूंनी डोक्याला हात लावला.
advertisement
भारताने दिलेल्या 285 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सावध सुरूवात केली, पण कॉनवे (16 रन) आणि हेन्री निकोल्स (10 रन) हे न्यूझीलंडचे ओपनर स्वस्तात आऊट झाले. कॉनवेला हर्षित राणाने तर निकोल्सला प्रसिद्ध कृष्णाने बोल्ड केलं. दोन विकेट लवकर गेल्यानंतर डॅरेल मिचेल आणि विल यंग यांच्यात 162 रनची पार्टनरशीप झाली. विल यंग 87 रनवर आऊट झाला, त्याला कुलदीप यादवने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. डॅरेल मिचेल 131 रनवर आणि ग्लेन फिलिप्स 32 रनवर नाबाद राहिला.
advertisement

केएल राहुलचं झुंजार शतक

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर क्रिस्टियन क्लार्कने रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची विकेट घेतली. पण केएल राहुलचं शतक आणि कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकामुळे भारताला 7 विकेट गमावून 284 रनपर्यंत मजल मारता आली. केएल राहुलने 92 बॉलमध्ये 112 आणि शुभमन गिलने 53 बॉलमध्ये 56 रन केले. न्यूझीलंडकडून क्लार्कला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. याशिवाय काईल जेमसिन, झॅकरी फोल्कस, जेडेन लेनॉक्स आणि मायकेल ब्रेसवेलला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : मोठ्या घोडचुकीमुळे 'प्रसिद्ध' झाला कृष्णा, टीम इंडियाच्या 10 खेळाडूंनी लावला डोक्याला हात!
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement