Virat Kohli : भारत-न्यूझीलंड सीरिजआधी विराटचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी कोहलीची मॅचमधून माघार, कारण काय?

Last Updated:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजआधी विराटने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भारत-न्यूझीलंड सीरिजआधी विराटचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी कोहलीची मॅचमधून माघार, कारण काय?
भारत-न्यूझीलंड सीरिजआधी विराटचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी कोहलीची मॅचमधून माघार, कारण काय?
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजआधी विराटने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या सूचनांनुसार विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीच्या सुरूवातीच्या 2 सामन्यांमध्ये खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये विराटने धुमाकूळ घातला. दिल्लीकडून खेळताना विराटने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. भारत-न्यूझीलंड सीरिजआधी विराट 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध आणखी एक सामना खेळेल, असं सांगण्यात येत होतं, पण या सामन्यातून विराटने माघार घेतली आहे.
दिल्लीच्या प्रशिक्षकांनी विराट कोहली रेल्वेविरुद्ध खेळणार नसल्याचे पुष्टी केली. याचा अर्थ विराट आता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये थेट मैदानावर दिसणार आहे. दिल्ली हा सामना कोहलीशिवाय रेल्वेविरुद्ध खेळेल आणि ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल.
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध दिल्लीकडून न खेळण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला आहे. हा सामना उद्या, मंगळवार, 6 जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या सूचनांनुसार, कोहलीने या स्पर्धेत दिल्लीसाठी आधीच दोन सामने खेळले आहेत. त्याने आंध्र प्रदेश आणि गुजरातविरुद्ध अनुक्रमे 131 आणि 77 रन केल्या. या शानदार खेळींमुळे दिल्लीला सलग दोन विजय मिळवता आले. त्यानंतर कोहली पुढील तीन सामन्यांमध्ये खेळला नाही.
advertisement

दिल्लीचे प्रशिक्षक काय म्हणाले?

दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी हिंदुस्तान टाईम्सला याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले, 'नाही, तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही.' बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्रीय करारबद्ध खेळाडूंना किमान दोन विजय हजारे ट्रॉफी सामने खेळणे आवश्यक आहे, जे कोहलीने आधीच पूर्ण केले आहे. पण, डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की कोहली रेल्वेविरुद्ध सामना खेळेल. कोहली दिल्लीसाठी त्याच्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. या खेळींदरम्यान, त्याने आणखी एक मोठा टप्पा गाठला, तो 16 हजार लिस्ट ए रन सर्वात जलद पूर्ण करणारा खेळाडू बनला. त्याने त्याच्या 330 व्या इनिंगमध्ये हा टप्पा गाठला आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने 391 इनिंगमध्ये 16 हजार रन पूर्ण केल्या होत्या.
advertisement

विराट-रोहितचं कमबॅक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी धुमाकूळ घालताना दिसेल. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 302 रन काढल्यानंतर, कोहली आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडिया सध्या कमी वनडे क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं कोहली सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान रोहित शर्माही विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून दोन सामने खेळला आहे. विराटसोबतही रोहितही न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये मैदानात दिसेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : भारत-न्यूझीलंड सीरिजआधी विराटचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी कोहलीची मॅचमधून माघार, कारण काय?
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement