Weather Alert : महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, आता नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
ढगाळ हवामानामुळे राज्यातील विविध भागांत पहाटे धुके आणि दव पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्यावर पोहोचला आहे.
1/7
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सध्या थांबल्याने राज्यातील हवामानात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम किमान तापमानावर होत आहे. अनेक भागांत किमान तापमानात वाढ नोंदवली जात असून, थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील विविध भागांत पहाटे धुके आणि दव पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्यावर पोहोचला आहे. पाहुयात, 6 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
कोकण विभागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत धुके जाणवू शकते, तर दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहील.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. पुणे शहरात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पहाटे धुक्याची स्थिती असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांत काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

4/7
मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील इतर भागांतही किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव कमी जाणवणार आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका ओसरला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. पहाटे थोडासा गारवा जाणवू शकतो, तर दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भात काही भागांत सकाळच्या वेळेत धुक्याचे वातावरण दिसून येत आहे. नागपूर येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील. सकाळी धुके राहण्याची शक्यता असून, त्यानंतर आकाश निरभ्र होण्याचा अंदाज आहे.

7/7
एकंदरीत, राज्यात किमान तापमानात वाढ झाली असली तरी थंडी पूर्णपणे कमी झालेली नाही. हवामानातील बदलामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत राहणार आहे. तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement