न्यूमरोलॉजीनुसार कोणत्या मूलांकाच्या लोकांनी काळा धागा बांधू नये, कोणासाठी ठरतो लकी?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ईट नजरेपासून वाचण्यासाठी किंवा शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हातात किंवा पायात काळा धागा बांधण्याची परंपरा जुनी आहे. अनेक लोक फॅशन म्हणूनही काळा धागा वापरतात.
Numerology : वाईट नजरेपासून वाचण्यासाठी किंवा शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हातात किंवा पायात काळा धागा बांधण्याची परंपरा जुनी आहे. अनेक लोक फॅशन म्हणूनही काळा धागा वापरतात. मात्र, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, काळा धागा सर्वांसाठी शुभ नसतो. काही मूलांकांच्या व्यक्तींनी काळा धागा बांधल्यास त्यांचे नशीब चमकू शकते, तर काहींसाठी तो आर्थिक आणि मानसिक तणावाचे कारण बनू शकतो.
मूलांक 8
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांच्यासाठी काळा धागा अत्यंत शुभ मानला जातो. या मूलांकाचा स्वामी शनिदेव आहे आणि काळा रंग शनीचा प्रिय रंग आहे. या लोकांनी काळा धागा बांधल्यास त्यांना नोकरी आणि व्यवसायात स्थिरता मिळते आणि शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होतो.
मूलांक 9 - मंगळाचा प्रभाव - सावध राहा
ज्यांचा मूलांक 9 (जन्मतारीख 9, 18, 27) आहे, त्यांनी काळा धागा बांधणे टाळावे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. शनी आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाची भावना असते. काळा धागा बांधल्यामुळे मंगळाची ऊर्जा कमी होऊन तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो आणि अपघाताची भीती वाढू शकते.
advertisement
मूलांक 1 आणि 7
मूलांक 1 (जन्मतारीख 1, 10, 19, 28) चा स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि शनी पिता-पुत्र असले तरी त्यांच्यात मतभेद आहेत, त्यामुळे मूलांक 1 च्या व्यक्तींनी काळा धागा बांधल्यास त्यांच्या आत्मविश्वासात घट होऊ शकते. मात्र, मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी नजरदोषापासून वाचण्यासाठी काळा धागा फायदेशीर ठरू शकतो.
मूलांक 4 आणि 5
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहूचा प्रभाव जास्त आहे, त्यांच्यासाठी काळा धागा संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतो. मूलांक 5 च्या व्यक्तींना जर संवादात अडचणी येत असतील, तर काळा धागा त्यांच्या ऊर्जेला संतुलित करण्यास मदत करतो.
advertisement
कोणत्या पायात किंवा हातात बांधावा?
अंकशास्त्रानुसार, पुरुषांनी काळा धागा उजव्या पायात किंवा हातात बांधणे शुभ असते, तर महिलांनी तो डाव्या पायात किंवा हातात बांधावा. असे केल्याने नकारात्मक शक्ती शरीरात प्रवेश करू शकत नाहीत.
काळा धागा बांधताना 'हे' नियम पाळा
काळा धागा नेहमी शनिवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी बांधावा.
धागा बांधताना शनीचा मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणणे अत्यंत फलदायी ठरते.
advertisement
ज्या हातात काळा धागा बांधला आहे, तिथे इतर कोणत्याही रंगाचा (विशेषतः लाल किंवा पिवळा) धागा बांधू नये.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 7:19 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
न्यूमरोलॉजीनुसार कोणत्या मूलांकाच्या लोकांनी काळा धागा बांधू नये, कोणासाठी ठरतो लकी?










