Pakistan Captain : मॅच हातातून गेली पण सलमानला चूकच लक्षात आली नाही! पाकिस्तानच्या कॅप्टनने 'या' भारतीय खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan captain Salman Ali Agha Statement : सामन्यानंतर बोलताना आगाने पराभवाचे खापर टीम इंडियाच्या बॅटर्सवर फोडलं असून पराभवाला कारणीभूत असलेल्या खेळाडूंना तंबी दिली आहे.
IND vs PAK Pakistan captain Statement : कोलंबोतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला असून पाकिस्तानला पुन्हा पराभवाची धूळ चारली आहे. टीम इंडियाने 8-1 ने आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. अशातच टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. कोलंबोतील या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानला 61 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर बोलताना आगाने पराभवाचे खापर टीम इंडियावर फोडलं असून पराभवाला कारणीभूत असलेल्या खेळाडूंना तंबी दिली आहे.
आमच्या स्पिनर्सवर पूर्ण विश्वास होता, पण...
मॅच संपल्यानंतर सलमान अली आगा म्हणाला की, "आमचा आमच्या स्पिनर्सवर पूर्ण विश्वास होता, पण आज त्यांचा दिवस नव्हता. खेळाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांवर परिणाम दाखवता आला नाही. गेल्या सहा महिन्यांत आमच्या स्पिनर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आज मोठ्या अपेक्षा होत्या." खरं तर, भारतीय बॅटर्ससमोर पाकिस्तानी फिरकीपटू हतबल दिसले, ज्यामुळे भारताने 175 रन्सचा डोंगर उभा केला होता.
advertisement
भारतीय बॅटर्सला विजयाचं क्रेडिट
टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याच्या निर्णयावरही सलमानने स्पष्टीकरण दिलं की, पहिल्या डावात पीच थोडी चिकट होती आणि बॉल पकड घेत होता. मात्र, भारताने त्या परिस्थितीतही चांगली धावसंख्या उभारली, असं म्हणत सलमानने भारतीय बॅटर्सला विजयाचं क्रेडिट दिलं. तर दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली झाली होती, पण पाकिस्तानी फलंदाजांनी संयम दाखवला नाही आणि मोठी पार्टनरशीप तयार करण्यात पाकिस्तानी बॅटर्स अपयशी ठरले, असंही सलमान म्हणाला.
advertisement
तुम्ही कायम बॅकफूटवर असता
दरम्यान, भारत-पाक सामन्यात भावना नेहमीच तीव्र असतात, पण आम्हाला त्यातून लवकर बाहेर पडावे लागेल. आमच्याकडे पुढच्या मॅचसाठी फक्त 2 दिवसांचा वेळ आहे. आम्हाला नामिबियाविरुद्धची पुढची मॅच जिंकून सुपर 8 साठी पात्र व्हायचे आहे. बॅटिंगमध्ये आमची सुरुवात खराब झाली. टी-20 फॉरमॅटमध्ये जर तुम्ही पॉवरप्लेमध्येच 3 किंवा 4 विकेट्स गमावल्या, तर तुम्ही कायम बॅकफूटवर असता, असंही सलमान अली आगा म्हणालाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 7:43 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Captain : मॅच हातातून गेली पण सलमानला चूकच लक्षात आली नाही! पाकिस्तानच्या कॅप्टनने 'या' भारतीय खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर






