Team India : हार्दिक 'प्लेअर ऑफ द मॅच', पण भारताच्या विजयाचा हिरो वेगळाच निघाला, कुणाला समजलंच नाही!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा तब्बल 101 रननी विजय झाला आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

हार्दिक 'प्लेअर ऑफ द मॅच', पण भारताच्या विजयाचा हिरो वेगळाच निघाला, कुणाला समजलंच नाही!
हार्दिक 'प्लेअर ऑफ द मॅच', पण भारताच्या विजयाचा हिरो वेगळाच निघाला, कुणाला समजलंच नाही!
कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा तब्बल 101 रननी विजय झाला आहे. भारताने दिलेलं 176 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 12.3 ओव्हरमध्ये फक्त 74 रनवर ऑलआऊट झाला. अर्शदीप, बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेने 1-1 विकेट घेतली. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. टीम अडचणीत असताना हार्दिकने 28 बॉलमध्ये 210.71 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 59 रन केले, ज्यात 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
हार्दिक पांड्या जरी या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तरी अक्षर पटेलनेही मोलाचं योगदान दिलं. अक्षर पटेल जेव्हा भारताकडून टी-20 सामना खेळतो तेव्हा तो कधी बॅटिंग, कधी बॉलिंग तर कधी फिल्डिंगनेही मॅच जिंकवून देतो. अनेकदा अक्षर पटेलला त्याच्या या कामगिरीचं श्रेय दिलं जात नाही.
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला बोल्ड केलं. मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्सची जोडी सेट व्हायच्या आधीच अक्षरने मार्करमला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मार्करमची विकेट जाताच दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडायला लागली. यानंतर अक्षरने एनरिक नॉर्कियाचीही विकेट घेतली. अक्षरने 2 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. त्याआधी बॅटिंगमध्येही अक्षरने 23 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं.
advertisement
एडन मार्करमची विकेट महत्त्वाची मानली जात होती कारण कटकच्या मैदानात दव पडायला सुरूवात झाली, त्यामुळे भारतीय बॉलरना बॉलिंग करण्यात अडचणी येतील, असं मानलं जात होतं. पण भारतीय बॉलरनी सुरूवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेवर दबाव बनवला, त्यामुळे 8 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 50 रनवर 5 विकेट गमावल्या होत्या.

टीम इंडिया नंबर वन

टी-20 क्रमवारीमध्ये टीम इंडिया सध्याची वर्ल्ड चॅम्पियन आहे. तसंच आयसीसी क्रमवारीमध्येही भारतीय टी-20 टीम पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट नव्या उंचीवर गेली आहे, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टीममध्ये असलेले ऑलराऊंडर. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल या ऑलराऊंडरनीच भारताला विजय मिळवून दिला.
advertisement

अक्षर पटेलची कामगिरी

कटकमधल्या टी-20 सामन्याआधी अक्षर पटेलने 83 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 138 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे, तर बॉलिंगमध्ये त्याने फक्त 7.25 च्या इकोनॉमी रेटने 79 विकेटही घेतल्या आहेत. काही सामन्यांमध्ये तर अक्षर पटेलने फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कॅच पकडून मॅचही फिरवली आहे, त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी अक्षर पटेल टीम इंडियाचा हुकमी एक्का असेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : हार्दिक 'प्लेअर ऑफ द मॅच', पण भारताच्या विजयाचा हिरो वेगळाच निघाला, कुणाला समजलंच नाही!
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement