advertisement

Gautam Gambhir : गंभीर असं बोलूच कसं शकतो? 'त्या' वक्तव्यावरून BCCI नाराज, बैठकीत नाट्यमय घडामोडी!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 2-0 ने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गंभीर असं बोलूच कसं शकतो? 'त्या' वक्तव्यावरून BCCI नाराज, बैठकीत नाट्यमय घडामोडी!
गंभीर असं बोलूच कसं शकतो? 'त्या' वक्तव्यावरून BCCI नाराज, बैठकीत नाट्यमय घडामोडी!
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 2-0 ने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता बीसीसीआय गौतम गंभीरच्या अलीकडच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर नाराज झाल्याचं वृत्त आहे. गंभीरला सध्या बोर्डाचा पाठिंबा असला तरी भारतात होणऱ्या 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या निकालानंतर परिस्थिती बदलू शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, गंभीरची सामन्यानंतरची पत्रकार परिषद वादाचा केंद्रबिंदू बनली आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या टेस्टनंतर गौतम गंभीरने खेळाडूंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून बीसीसीआय नाराज झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार कोलकाता टेस्टनंतर गौतम गंभीरने केलेलं वक्तव्य आगीत तेल टाकण्याचं काम करणारं होतं, असं बीसीसीआयला वाटत आहे. बीसीसीआयला गौतम गंभीरचं हे जाहीर विधान आणि त्याचा स्वर आवडलेला नाही.
advertisement

काय म्हणाला होता गंभीर?

कोलकाता टेस्टमधील पराभवानंतर गंभीरने मी स्पिन बॉलिंगला मदत करणारी खेळपट्टी मागितली होती, पण भारतीय खेळाडूंना चांगली बॅटिंग करता आली नाही. खेळाडू टिकून खेळले असते, तर आम्ही हा सामना जिंकलो असतो, असं गंभीर जाहीर पत्रकार परिषदेत म्हणाला होता. गंभीरच्या या वक्तव्यावरच बीसीसीआय नाराज झाल्याचं वृत्त आहे. गंभीर टीममधल्या त्याच्या खेळाडूंबाबत जाहीरपणे असं कसं बोलू शकतो? असा सवाल बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने बैठकीत विचारल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाची घरच्या मैदानातील टेस्ट क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. मागच्या वर्षभरात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी भारताने फक्त 2 मॅच जिंकल्या तर 5 सामन्यात टीमला पराभव पत्करावा लागला. गौतम गंभीर टीममध्ये स्पेशलिस्ट बॅटर आणि स्पेशलिस्ट बॉलरऐवजी ऑलराऊंडरना घेऊन खेळत असल्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीकाही केली आहे. टेस्ट क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरवरचा दबाव वाढत आहे, पण बीसीसीआय गंभीरला पदावरून हटवण्यास सध्या तरी उत्सुक नाही. भारताने यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे, त्यामुळे बीसीसीआयचा गंभीरवरचा विश्वास अजूनही कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : गंभीर असं बोलूच कसं शकतो? 'त्या' वक्तव्यावरून BCCI नाराज, बैठकीत नाट्यमय घडामोडी!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement