advertisement

IND vs WI : बोरीवलीच्या चाळीतला पोरगा बनला वेस्ट इंडिजची ताकद, भारताविरूद्धची मॅच जिंकवण्यासाठी उचलतोय मोठा वाटा

Last Updated:

बोरीवलीच्या चाळीतला एक पोरगा वेस्ट इंडिजच्या मदतीला धावून आला आहे. सध्या तो वेस्ट इंडिज संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी मदत करतो आहे.त्यामुळे हा पोरगा वेस्ट इंडिजच्या संघात काय भूमिका बजावतो आहे? हे जाणून घेऊयात.

News18
News18
India vs West Indies : टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याला काही तासात सूरूवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. बोरीवलीच्या चाळीतला एक पोरगा वेस्ट इंडिजच्या मदतीला धावून आला आहे. सध्या तो वेस्ट इंडिज संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी मदत करतो आहे.त्यामुळे हा पोरगा वेस्ट इंडिजच्या संघात काय भूमिका बजावतो आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर वेस्ट इंडिज संघाला वानखेडेवर सराव करण्यासाठी एका थ्रोडाऊन स्पेशालीस्टची आवश्यकता होती.त्यामुळे त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याकडे थ्रोडाऊन स्पेशालीस्ट मागणी केली होती.त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने अभिषेक जैनला फोन केला होता. ज्यावेळेस त्याला हा फोन येणार होता, त्यावेळेस तो आपल्या बोरीवलीजवळील दहिसरच्या भाड्याच्या चाळीत आराम करत होता. या दरम्यान अचानक त्यांचा फोन वाजला आणि समोरून एमसीएच्या अधिकाऱ्याने, 'वेस्ट इंडिजच्या संघाला बॉल टाकणार का?'यावेळी अभिषेकने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. त्यानंतर त्याला उद्या सकाळी आठ वाजता बोलावण्या आलं.
advertisement
दरम्यान वेस्ट इंडिज संघाला बॉलिंग करायची संधी मिळाल्याने तो प्रचंड उस्ताहीत होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवलीहून लोकल ट्रेन पकडून चर्चगेटला पोहोचला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षण डॅरेन सॅमीने बॉल कुठे टाकायचा हे सांगितले. अभिषेकने मान हलवली आणिू सूरूवात केली.
darren sammy with abhishek jain
darren sammy with abhishek jain
advertisement
अभिषेकने पहिला बॉल शेफर्ड रूदरफोर्डला टाकला.त्याची ही बॉलिंग पाहून डॅरेन सेमी प्रभावीत झाला होता. तसेच वेस्ट इंडिजच्या प्रत्येक खेळाडूने 15-20 मिनिटे फलंदाजी केली. माझे बहुतेक बॉल अचूकपणे उतरले.रदरफोर्डने चांगली फलंदाजी केली. या सर्वांमध्ये, हेटमायरने सर्वात मोठे शॉट्स मारले, परंतु मी त्याला अनेक वेळा हरवण्यात यशस्वी झालो," अभिषेकने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला एका खास मुलाखतीत सांगितले.
advertisement
सॅमी सर खूप आनंदी झाले. त्यांनी एका व्यवस्थापकाला फोन केला आणि सांगितले, 'या मुलाला दररोज फोन करा.' त्यांनी त्यांना आगामी सराव सत्रांसाठी मला रोस्टरमध्ये ठेवण्यास सांगितले," असे अभिषेक म्हणाला.
कोण आहे अभिषेक जैन?
मुंबईच्या सुप्रसिद्ध साईड-आर्म थ्रोडाऊन स्पेशालिस्टपैकी एक असलेल्या अभिषेकने भारतीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावांना गोलंदाजी केली आहे. ज्यात केएल राहुल, इरफान पठाण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.
advertisement
अभिषेक त्याच्या धाकट्या भावासोबत दहिसरमधील एका चाळीत राहतो.त्याचा भाऊ वकिली करतो आणि त्याचा सर्व शैक्षणिक खर्च अभिषेक करतो.अभिषेकचे आई वडील मध्यप्रदेशात राहतात. मी इथे राहतो आणि माझ्या भावाची आणि त्याच्या शिक्षणाची काळजी घेतो. मी माझ्या पालकांना पैसे देखील पाठवतो. घरभाडे देणे, माझ्या पालकांना आधार देणे,माझ्या भावाचे शिक्षण सांभाळणे, या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : बोरीवलीच्या चाळीतला पोरगा बनला वेस्ट इंडिजची ताकद, भारताविरूद्धची मॅच जिंकवण्यासाठी उचलतोय मोठा वाटा
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement