IPL 2026 : 'स्काय'ला मैदानात यायचं होतं, पण... हार्दिक-सूर्यामध्ये ऑल इज नॉट वेल? टीम शीटने टेन्शन वाढवलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरवर रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 221 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 4 विकेट गमावून पार केला.
मुंबई : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरवर रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 221 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 4 विकेट गमावून पार केला. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईने मोसमातल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबईने आयपीएल 2026 ची विजयाने सुरूवात केली असली तरी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सगळं काही आलबेल आहे का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. केकेआरविरुद्धच्या मॅचच्या टॉसआधीच मुंबई इंडियन्सच्या टीम शीटने अनेकांना धक्का दिला. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचं नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हतं. सूर्याला इम्पॅक्ट सबच्या यादीमध्ये ठेवण्यात आलं होतं.
advertisement
सूर्या इम्पॅक्ट सब का?
मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने याने सूर्याला इम्पॅक्ट सब म्हणून का खेळवण्यात आलं? याचं उत्तर दिलं आहे. हा निर्णय फॉर्म किंवा टीम कॉम्बिनेशनचा नव्हता, तर एका छोट्या फिटनेस समस्येचा होता, असं जयवर्धने यांनी सांगितलं. 'आपण कारण नसताना स्टोरी बनवणार नाही, अशी अपेक्षा. कॅम्पमध्ये सगळे खूश आहेत, सूर्या उशीरा टीममध्ये आला, त्याला ग्रोईनची समस्या होती. तो फिल्डिंग करत होता, पण पुढच्या सामन्याला आणखी 5 दिवस शिल्लक आहेत. सूर्याला शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये फिल्डिंग करायची होती, पण आम्ही त्याला नकार दिला', असं महेला जयवर्धने म्हणाले आहेत.
advertisement
मागच्या मोसमात रोहित इम्पॅक्ट सब
आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहित शर्मा इम्पॅक्ट सब म्हणून खेळला होता. तेव्हाही रोहित शर्माच्या फिटनेसची समस्या होती, त्यामुळे त्याला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवलं होतं, असं महेला जयवर्धने यांनी सांगितलं होतं. यावेळी मात्र रोहित पूर्णपणे फिट असल्यामुळे तो पूर्ण 20 ओव्हर फिल्डिंग करणार असल्याचंही जयवर्धने म्हणाला.
अनफिट होता तर पळाला कसा?
advertisement
सूर्यकुमार यादव मुंबईच्या बॅटिंगवेळी इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात आला आणि 8 बॉलमध्ये 16 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत असताना सूर्याने फुटवर्कही दाखवलं आणि तो रन काढण्यासाठी पळतही होता, तेव्हा त्याला ग्रोईनच्या दुखापतीचा त्रास होत असल्याचं जाणवलं नाही, त्यामुळे सूर्या नेमका अनफिट होता का टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
आयपीएलच्या या मोसमाआधी महेला जयवर्धने यांना इम्पॅक्ट सबबद्दल प्रश्नही विचारण्यात आला होता, तेव्हा मुंबईच्या टीममध्ये रोहित आणि सूर्या हे दोनच खेळाडू आहेत, जे बॉलिंग करत नाहीत असं उत्तर दिलं होतं. जयवर्धने यांच्या या उत्तरावरून रोहित किंवा सूर्यालाच या मोसमात इम्पॅक्ट सब म्हणून खेळवलं जाणार, हे निश्चित मानलं जात होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 4:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'स्काय'ला मैदानात यायचं होतं, पण... हार्दिक-सूर्यामध्ये ऑल इज नॉट वेल? टीम शीटने टेन्शन वाढवलं!





