Karun Nair : ज्या टीममुळे नशीब बदललं, त्यालाच धोका दिला, करुण नायर असं का वागला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ज्या टीममुळे नशीब बदललं, 8 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक झालं, त्याच टीमला सोडण्याचा निर्णय करुण नायरने घेतला आहे.
मुंबई : ज्या टीममुळे नशीब बदललं, 8 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक झालं, त्याच टीमला सोडण्याचा निर्णय करुण नायरने घेतला आहे. 2022 साली करुण नायरला कर्नाटकच्या टीममधून वगळण्यात आलं, त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी मिळत नव्हती. अखेर खचलेल्या करुण नायरने 10 डिसेंबर 2022 ला एक पोस्ट केली, प्रिय क्रिकेट मला आणखी एक संधी दे, असं करुण त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. यानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशनने करुण नायरला पाठिंबा दिला. 2023 मध्ये करुण नायर कर्नाटक सोडून विदर्भामध्ये आला आणि त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली.
करुण नायरचं टीम इंडियात कमबॅक
विदर्भासाठी खेळताना करुण नायरची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने रणजी ट्रॉफी ते विजय हजारे ट्रॉफीपर्यंत धावांचा पाऊस पाडला. या दरम्यान विदर्भाने 2023-24 च्या रणजी हंगामाचा अंतिम सामना खेळला. त्यानंतर 2024-25 च्या हंगामात विजय मिळवण्यात विदर्भाला यश आले. विजय हजारे ट्रॉफीच्या शेवटच्या हंगामात नायरने 8 इनिंगमध्ये 5 शतकांसह 779 रन केल्या. संपूर्ण स्पर्धेत करुण फक्त दोनदाच आऊट झाला. या कामगिरीनंतर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली आणि टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी पुन्हा उघडले.
advertisement
नायर कर्नाटकात परतला
ज्या टीममुळे करुण नायरला इतके यश मिळाले, तो विदर्भाचा संघ सोडण्याचा निर्णय करुण नायरने घेतला आहे. करुण नायर रणजी ट्रॉफीच्या पुढील हंगामात पुन्हा एकदा कर्नाटककडून खेळताना दिसणार आहे. नायरने वैयक्तिक कारणांमुळे विदर्भ सोडून कर्नाटककडून पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. करुण नायर हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीमसोबत आहे. पहिल्या तीनही टेस्टमध्ये करुण नायरला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
advertisement
करुण नायरकडून निराशा
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये करुण नायरला आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. पण आतापर्यंत तो एकही अर्धशतक ठोकू शकला नाही. 3 सामन्यांच्या 6 डावात नायरच्या बॅटमधून 21.83 च्या सरासरीने 131 रन केल्या आहेत. सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरच्या यादीत तो 12 व्या क्रमांकावर आहे. दोन सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळूनही करुण नायर चमत्कार करू शकला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकण्याव्यतिरिक्त, नायरला आतापर्यंत एकही अर्धशतक करता आलेले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2025 10:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Karun Nair : ज्या टीममुळे नशीब बदललं, त्यालाच धोका दिला, करुण नायर असं का वागला?