VIDEO : रणजीच्या सेमीफायनलमध्ये खतरनाक ड्रामा! खेळाडूच्या हेल्मेटला बॉल लागला अन्... विकेट पाहून अंपायरही गोंधळले, केरळचा फायनलमध्ये प्रवेश
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Ranji Trophy, Kerla vs Gujrat: रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात केरळने आश्चर्यकारक विजय मिळवत 74 वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Ranji Trophy, Kerla vs Gujarat: रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात केरळने आश्चर्यकारक विजय मिळवत 74 वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे.या सामन्यात गुजरातला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्चकता होती आणि त्याच्याकडे फक्त एकच विकेट उरला होता. त्यावेळेस केरळच्या संघाला हा विकेट अगदी नाट्यमय पद्धतीने मिळाला आहे. अंपायर्सना देखील काही क्षणासाठी यावर विश्वास बसवला नव्हता. पण अखेर केरळने बाजी मारत फायनलमध्ये धडक दिली.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुजरात आणि केरळ या संघात सेमी फायनल लढत सूरू होती. या दरम्यान केरळने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केरळ 457 धावा केल्या होत्या. या प्रत्युरात गुजरातचा संघ 455 धावातच आटोपला. या सामन्यात गुजरात संघाची शेवटची विकेट अर्जन नागवासलाच्या रूपात पडली. पण ही विकेट पडताना मैदानात भयंकर ड्रामा झाला. अपायर्स देखील गोंधळात होते. मात्र नंतर त्यांनी आऊटचा डिसीजन दिला.
advertisement
Gujarat need 2 runs, Kerala need 1 wicket to qualify for the finals and Unfortunate OUT decided the result.pic.twitter.com/VkJ0Ztb8jV
— Don Cricket 🏏 (@doncricket_) February 21, 2025
गुजरातला विजयासाठी दोन धावांची गरज होती तर केरळला एका विकेटची आवश्यकता होती.यावेळी अर्जन नागवासलाने मारलेला शॉट लेगवर उभ्या असलेल्या सलमान निजारच्या हेल्मेटला लागला आणि बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला. त्यानंतर अपायर्सने काही काळ चर्चा केली आणि आऊट दिले. अशाप्रकारे 74 वर्षांनंतर केरळने अंतिम फेरीत प्रवेश केला.
advertisement
गुजरातने कालच्या 7 बाद 429 धावसंख्येवरून आपला डाव पुन्हा सुरू केला. सकाळच्या सत्रात, सरवटेने जयमीत पटेल (७८) ला मोहम्मद अझरुद्दीनने स्टंपिंग करून केरळला ४३६ धावांवर आठवे यश मिळवून दिले. त्यानंतर सरवटेने सिद्धार्थ देसाई (३०) ला एलबीडब्ल्यू बाद केले. अर्जन नागवासवाला (१०) हा देखील सरवटेच्या बळींपैकी एक होता. केरळच्या गोलंदाजांनी गुजरातला १७४.४ षटकांत ४५५ धावांत गुंडाळून दोन धावांची आघाडी घेतली. हे उल्लेखनीय आहे की केरळने पहिल्या डावात ४५७ धावा केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रणजीच्या सेमीफायनलमध्ये खतरनाक ड्रामा! खेळाडूच्या हेल्मेटला बॉल लागला अन्... विकेट पाहून अंपायरही गोंधळले, केरळचा फायनलमध्ये प्रवेश