advertisement

PAK vs ENG : स्टेडियममध्ये तुफान राडा! पंगा घ्यायला आलेल्या पाकिस्तानच्या जुहैबला इंग्लंडच्या फॅनने शिकवला धडा, पाहा Video

Last Updated:

Pak Fan Fight With Eng Supporter : रागाच्या भरात स्टेडियममध्ये पाकिस्तानी फॅनने इंग्लंडच्या समर्थकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Pak Fan Fight With Eng Supporter
Pak Fan Fight With Eng Supporter
Pak Fan Fight With Eng Supporter : श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला 2 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. क्रिकेटच्या मैदानात हार-जीत होतच असते, परंतु पाकिस्तानच्या एका चाहत्याला हा पराभव पचवणे कठीण झाले. या चाहत्याने रागाच्या भरात स्टेडियममध्ये असलेल्या इंग्लंडच्या समर्थकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हॅरी ब्रूकचं  झंझावाती शतक

या टी20 वर्ल्ड कप (World Cup) सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावून 164 रन्स बनवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने झंझावाती शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने हा सामना शेवटपर्यंत लढून गमावला असला तरी, खराब कॅप्टन्सीमुळे त्यांना हा पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आता क्रीडा वर्तुळात रंगली आहे.
advertisement
advertisement

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मैदानातील या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, इंग्लंडच्या समर्थकासमोर पाकिस्तानी चाहत्याला मान खाली घालावी लागली. विशेष म्हणजे, हा चाहता केवळ रागापोटी भांडला नसून त्याचा मुख्य उद्देश प्रसिद्धी मिळवणे हा होता. पाकिस्तानच्या या चाहत्याचे नाव जुहैब अहमद असून तो एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे, जो नेहमी अशा वादातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.
advertisement

जुहैब अहमद कोण?

जुहैब अहमद याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्याला सँडपेपर दाखवून डिवचण्याचा प्रयत्न केला होता, तिथेही त्याला चोख प्रत्युत्तर मिळाले होते. हा इन्फ्लूएंसर नेहमीच परदेशी चाहत्यांशी वाद घालून व्हिडिओ बनवतो आणि स्वतःची नाचक्की करून घेतो. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय चाहत्यांशी भिडण्याची तो कधीच हिंमत करत नाही, उलट भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान तो भारतीयांसोबत मैत्रीचे व्हिडिओ बनवून व्हायरल होण्याचा प्रयत्न करतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs ENG : स्टेडियममध्ये तुफान राडा! पंगा घ्यायला आलेल्या पाकिस्तानच्या जुहैबला इंग्लंडच्या फॅनने शिकवला धडा, पाहा Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement