VIDEO : पाकिस्तानी खेळाडूंना भलताचं माज, पुन्हा एकदा दाखवली लायकी; हात मिळवताना केलं 'असं' कृत्य

Last Updated:

Junior Davis Cup 2025 :  ज्युनियर डेव्हिस कप 2025 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. हा सामना कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे खेळला गेला, जिथे भारताचे प्रकाश सरन आणि तविश पाहवा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि सुपर टाय-ब्रेकमध्ये आपापल्या एकेरी सामन्यात विजय मिळवून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली.

News18

पाकिस्तानी खेळाडूचे असभ्य वर्तन
कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे खेळल्या जाणाऱ्या ज्युनियर डेव्हिस कप 2025 च्या सामन्यात एक विचित्र घटना घडली. पाकिस्तान आणि पाकिस्तानी खेळाडू नेहेमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने अनेक गोष्टींमधून भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध तोडले. या मध्ये खेळातही भारत मागे राहिलेला नाही. पाकिस्तानने जे कृत्य केले त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. पण पाकिस्तानी खेळाडूंचा माज काही उतरत नाही.
advertisement
हात मिळवताना केला अनादर
सामन्यानंतर खिलाडूवृत्तीचे उदाहरण देता आले असते, परंतु एका पाकिस्तानी अंडर-16 खेळाडूने काहीतरी वेगळेच केले. पराभवानंतर हस्तांदोलन करताना, पाकिस्तानी खेळाडूने अत्यंत असभ्य आणि अनादरपूर्ण वर्तन केले. जेव्हा भारतीय खेळाडूने हात पुढे केला तेव्हा पाकिस्तानी खेळाडूने तो सामान्य पद्धतीने हलवला नाही तर रागाच्या भरात हातावर जोरात मारला. एवढेच नाही तर त्याने पुन्हा तीच कृती केली आणि यावेळी हस्तांदोलन केल्यानंतर त्याने आपला हात झटकून बाजूला केला.
advertisement
हे वर्तन खेळाडूंच्या भावनेविरुद्ध होते आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूवर टीका करण्यास सुरुवात केली. खेळात जिंकणे आणि हरणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु खेळाडूच्या अशा वृत्तीने अनेकांना नाराज केले. पाकिस्तानच्या अश्या वर्तनामुळे आणि अनेक कारणांमुळे ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : पाकिस्तानी खेळाडूंना भलताचं माज, पुन्हा एकदा दाखवली लायकी; हात मिळवताना केलं 'असं' कृत्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement