Ranji Trophy : मुंबई संकटात, पण दोघं जीव तोडून खेळले, शतक हुकलं पण संघाची लाज राखली!

Last Updated:

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण अजिंक्यचा हा निर्णय चुकीचा ठरला.कारण सामन्याच्या सुरूवातीपासून एक एक करून खेळाडू आऊट झाला. सामन्यात एक वेळ तरी अशी होती. अवघ्या 100 धावांच्या आत 6 विकेट पडल्या होत्या.

ranji trophy 2025
ranji trophy 2025
Ranji Trophy 2025, Mumbai vs Haryana : रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबई विरूद्ध हरियाणा यांच्यात ईडन गार्डन मैदानावर सामना सूरू आहे. या सामन्यात मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. कारण मुंबईच्या अवघ्या 100 धावांच्या आत 6 विकेट पडल्या होत्या. पण शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या 300 पार नेली आहे. पण मुंबईचा डाव सावरता सावरता या खेळाडूंच शतक मात्र हुकलं आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची निराशा झाली आहे.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण अजिंक्यचा हा निर्णय चुकीचा ठरला.कारण सामन्याच्या सुरूवातीपासून एक एक करून खेळाडू आऊट झाला. सामन्यात एक वेळ तरी अशी होती. अवघ्या 100 धावांच्या आत 6 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे इथून मोठी धावसंख्या उभारणे मुंबईकरांसाठी खूपच कठिण होते.
पण मैदानावर उतरलेल्या शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या दोन खेळाडूंनी अंगावर घेतले आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं. दोघांनी सामन्यात टीचून फलंदाजी केली. शम्स मुलानीने 91 धावा केल्या. यामुळे त्याचे अवघे 9 धावाने शतक हुकलं. या खेळीत त्याने 10 चौकार लगावले होते. त्यानंतर तनुष कोटीयन 97 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 13 चौकार लगावले. या दरम्या्न अवघ्या तीन धावांनी त्याचं शतक हुकलं होतं.
advertisement
मुंबईसाठी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन जीव तोडून खेळले. पण दोघांना आपलं शतक साजरा करता आला नाही. पण मोक्याच्या क्षणी केलेल्या खेळीमुळे मुंबईच्या धावसंख्या 100 वरून 300 च्या पार गेली. आता मुंबईचा पहिला डाव 315 धावांवर ऑल आऊट झाला आहे.
हरियाणाकडून अंशुल कंबोज आणि सुमित कुमारने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. अनुज, अजित चहल, जयंत यादव आणि निशांत संधूने या सामन्यात प्रत्येकी 1 विकेट घेतला आहे. सध्या हरियाणाची बॅटींग सूरू आहे. आणि बातमी लिहेपर्यंत हरियाणाचा डाव शुन्य बाद 60 धावांच्या पलिकडे गेला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : मुंबई संकटात, पण दोघं जीव तोडून खेळले, शतक हुकलं पण संघाची लाज राखली!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement