दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इतिहास रचला, पहिल्यांदा IPL मध्ये महागडा ठरला, नंतर संघाला सेमी फायनलला पोहोचवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरने मध्य प्रदेशचा 56 धावांनी पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जम्मू काश्मीरला हा सामना जिंकूण देण्यात आणि सेमी फायनलला पोहोचवण्यात वेगवान गोलंदाज आकीब नबी डारने मोलाची भूमिका बजावली होती.
Jammu Kashmir Reach Semi Final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरने मध्य प्रदेशचा 56 धावांनी पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जम्मू काश्मीरला हा सामना जिंकूण देण्यात आणि सेमी फायनलला पोहोचवण्यात वेगवान गोलंदाज आकीब नबी डारने मोलाची भूमिका बजावली होती. कारण या सामन्यात त्याने एकट्याने 12 खेळाडूंना आऊट केले होते. आणि हा तोच खेळाडू जो जम्मू काश्मीरचा आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू होता.त्यामुळे दोन महिन्यात त्याने अशी कामगिरी करून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.
जम्मु काश्मीरने दुसऱ्या डावात 248 धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावातून मिळालेल्या 42 धावांच्या आघाडीच्या बळावर मध्यप्रदेशसमोर 290 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना सारांश जैनने 64 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या व्यतिरिक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे मध्य प्रदेशचा डाव 234 धावांवर आल आऊट झाला होता. मध्यप्रदेशला ऑल आऊट करण्यात आकीब डारने मोलाची भूमिका बजावली होती कारण त्याने एकट्याने 5 विकेट काढल्या होत्या.त्याच्यासोबत आबीद मुश्ताकने 3 विकेट, सुनील कुमार आणि युद्धवीर सिंह चरकने प्रत्येकी दोन विकेट गमावल्या होत्या.त्यामुळे आकीबच्या यात गोलंदाजीमुळे जम्मू काश्मीरने मध्य प्रदेशचा 56 धावांनी पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
advertisement
जम्मू काश्मीरकडून दुसऱ्या डावात वंशज शर्माने 54 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्यासोबत आबिद मुश्ताकच्या 41 धावांच्या बळावर जम्मूने 248 धावा केल्या होत्या. मध्यप्रदेशकडून कुलदीप सेनने 4, व्यंकटेश अय्यर आणि रामवीर गुज्जरने प्रक्येकी 3 विकेट घेतल्या होत्या.
तर पहिल्या डावात मध्यप्रदेशने 152 धावा केल्या होत्या. यावेळी मध्य प्रदेशकडून यश दुबेने 58 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मध्यप्रदेशने इतक्या धावा ठोकल्या होत्या. यावेळी जम्मूकडून आकीब नबी डारने एकट्याने 7 विकेट काढल्या आहेत. तर सुनील कुमारने 3 विकेट काढल्या होत्या.
advertisement
जम्मूने पहिल्या डावात 194 धावा ठोकल्या होत्या. यावेळी शुभम खजूरीयाने 60 तर युद्धवीर सिंग चरकने 41 धावांची खेळी केली होती.यावेळी मध्य प्रदेशकडून कुलदीप सेनने 5 विकेट, कुमार कार्तिकेयाने 3 तर आर्यन पांडेने 2 विकेट घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे या सामन्यात जम्मू काश्मीरच्या विजयाचा शिल्पकार हा आकीब नबी डार ठरला आहे. कारण त्याने या सामन्यात एकट्याने 12 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे हा त्याने एक वेगळा इतिहास रचला आणि आयपीएलमध्ये त्याला 8.40 कोटीच्या विक्रमी रक्कमेला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते, त्यामुळे हा एक वेगळा रेकॉर्ड होता.त्यामुळे दोनच महिन्यात आकीब डारने दोनदा इतिहास रचला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 6:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इतिहास रचला, पहिल्यांदा IPL मध्ये महागडा ठरला, नंतर संघाला सेमी फायनलला पोहोचवलं







