Shubman Gill : गिल अन् सिलेक्टर्समध्ये मोठी डिल... टीम इंडियात मोठं काहीतरी घडणार, आतली बातमी फुटली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी शुभमन गिलची भारतीय टीममध्ये निवड झाली नाही, त्यावरून मोठा वाद सुरू आहे. टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर गिलच्या टी-20 करिअरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी शुभमन गिलची भारतीय टीममध्ये निवड झाली नाही, त्यावरून मोठा वाद सुरू आहे. टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर गिलच्या टी-20 करिअरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, पण आता गिल नव्या ताकदीसह आणि नव्या भूमिकेत कमबॅक करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलनंतर गिलचे कर्णधार म्हणून टीम इंडियामध्ये पुनरागमन जवळजवळ निश्चित आहे.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवसाठी चित्र स्पष्ट आहे. टी-20 वर्ल्ड कपचा निकाल काहीही असो, तो आयपीएलनंतर कर्णधारपद गमावू शकतो. या संपूर्ण नाट्यमय घडामोडींमागे गौतम गंभीर असल्याचंही बोललं जात आहे, ज्याने गिल आणि निवड समितीमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. गंभीरच्या हस्तक्षेपाने केवळ समीकरण बदलले नाही तर हे देखील स्पष्ट केले की भारतीय क्रिकेटमध्ये निर्णय आता केवळ आकडेवारीवर आधारित नाहीत तर नेतृत्व गुणांवर आधारित घेतले जात आहेत.
advertisement
सूर्यकुमार यादव कर्णधारपद सोडणार?
वृत्तानुसार, टी-20 वर्ल्ड कपचा निकाल काहीही लागला तरीही, आयपीएलनंतर सूर्यकुमार यादव कर्णधार राहणार नाही. बीसीसीआय आणि निवड समिती आता दीर्घकालीन उपाययोजना म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये टीमचे नेतृत्व करण्यास सक्षम असलेल्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवण्याचा विचार करत आहे. या रेसमध्ये शुभमन गिल आघाडीवर असल्याचे दिसून येते.
गौतम गंभीर गेम-चेंजर
advertisement
शुभमन गिलच्या पुनरागमनाच्या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये गौतम गंभीरचे नाव महत्त्वाचे मानले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीरने निवड समिती आणि गिल यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले आणि दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गंभीरचा असा विश्वास आहे की गिलकडे केवळ टेकनिकच नाही तर मानसिक कणखरता आणि नेतृत्वगुण देखील आहेत, ज्यामुळे तो भविष्यातील कर्णधार बनू शकतो. तात्काळ निकालांऐवजी, निवड समिती भविष्यातील रणनीतींवर लक्ष केंद्रित करत आहे. या दृष्टीनुसार, गिलला पुन्हा एकदा टीमचा प्रमुख बनवण्याची योजना आखण्यात आली आहे. आयपीएलनंतर टीम इंडियामध्ये झालेल्या बदलांमध्ये शुभमन गिलला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गिल अन् सिलेक्टर्समध्ये मोठी डिल... टीम इंडियात मोठं काहीतरी घडणार, आतली बातमी फुटली!










