advertisement

IND vs SA : साऊथ अफ्रिकेच्या कॅप्टनने या दोन खेळाडूंवर फोडलं टीम इंडियाच्या पराभवाचं खापर, सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट!

Last Updated:

Aiden Markram Statement after beat india in super 8 : टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित अधिक किचकट झालं आहे. अशातच विजयानंतर साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन अॅडन मार्करम याने दोन खेळाडूंना टीम इंडियाचा व्हिलन ठरवलं.

South African Captain Aiden Markram Statement
South African Captain Aiden Markram Statement
India vs South Africa T20 WC Super 8 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सुपर 8 चा दुसरा सामना पहायला मिळाला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने यजमान टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. भारताचे बॅटर्स फक्त 111 रन्स करू शकले. त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित अधिक किचकट झालं आहे. अशातच विजयानंतर साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन अॅडम मार्करम याने दोन खेळाडूंना टीम इंडियाचा व्हिलन ठरवलं आहे. काय म्हणाला कॅप्टन? पाहा

काय म्हणाला अॅडम मार्करम?

या पीचवर खेळणं सोपं नव्हतं, पण आमच्या खेळाडूंनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बदल केला आणि प्लॅन्सची यशस्वी अंमलबजावणी केली. बॉलरनी या मॅचमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं. या स्पर्धेची सुरुवात त्यांच्यासाठी थोडी कठीण झाली होती, पण आज ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. टीममधील प्रत्येक बॉलरने आपल्या रोलनुसार अचूक टप्प्यावर बॉल टाकत भारतीय बॅट्समनना रोखून धरलं, ज्यामुळे हा विजय साऊथ अफ्रिकेच्या पारड्यात पडला असं मार्करम याने म्हटलं आहे.
advertisement

मॅचचा टर्निंग पाईंट

डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस या दोघांनी टीमची इनिंग सावरली आणि आम्हाला मॅचमध्ये टिकवून ठेवलं. पीच थोडं संथ होतं, त्यामुळे आम्ही आमचा अहंकार बाजूला ठेवून केवळ धावण्यावर आणि गॅप शोधण्यावर भर दिला. मधल्या ओव्हरमध्ये केलेली बॅटिंगच या मॅचमध्ये महत्त्वाचा फरक ठरली, असं म्हणत त्याने मॅचचा टर्निंग पाईंट सांगितला.
advertisement

टॉप ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलं

फिल्डिंगमध्ये काही चुका झाल्या असल्या तरी टीममधील खेळाडू एकमेकांशी चांगले कनेक्टेड होते. एनगिडी हा टीमसाठी महत्त्वाचा विकेट टेकर असून परिस्थितीनुसार त्याचा वापर केला जातो. टीम इंडियाची बॅटिंग साईड त्यांना खेळी शकली नाही, असं म्हणत त्याने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
advertisement

सेमीफायनलचा रस्ता अवघड

दरम्यान, साऊथ अफ्रिकेच्या विजयानंतर आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट अधिक किचकट झालं आहे. टीम इंडियाला आता उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मार्जिनने जिंकावेच लागणार आहे. त्यामुळे झिम्बॉब्वे आणि वेस्ट इंडिज यांना मोठ्या दमाने खेळावं देखील लागेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : साऊथ अफ्रिकेच्या कॅप्टनने या दोन खेळाडूंवर फोडलं टीम इंडियाच्या पराभवाचं खापर, सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट!
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement