T20 World Cup : 8 मॅच अन् 29 दिवस शांत राहिला, पण फायनलमध्ये 'फुटला', सगळ्यांचा राग न्यूझीलंडवर काढला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करायला आलेले टीम इंडियाचे ओपनर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी धमाकेदार सुरूवात करून दिली.
इनिंगच्या पहिल्या ओव्हरला टीम इंडियाने 7 आणि दुसऱ्या ओव्हरला 5 रन काढले, यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून टीम इंडियाने गिअर बदलला. जेकब डफीच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 15, लॉकी फर्ग्युसनच्या चौथ्या ओव्हरमध्ये 24, मॅट हेन्रीच्या पाचव्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन आल्या. यानंतर 6 व्या ओव्हरमध्ये 20 रन काढल्या, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाने तब्बल 92 रन केले. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या पॉवर प्लेमधला हा सर्वाधिक स्कोअर ठरला आहे. 7.2 ओव्हरमध्येच टीम इंडियाच्या 100 रन पूर्ण झाल्या. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातलं एखाद्या टीमचं हे सगळ्यात जलद शतक ठरलं आहे.
advertisement
अभिषेकने केली धुलाई
अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, यात 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. अभिषेकने त्याच्या या वादळी खेळीमध्ये 268.42 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, तर संजू सॅमसनने 17 बॉलमध्ये 194.12 च्या स्ट्राईक रेटने 33 रन केले, ज्यात 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. 21 बॉलमध्ये 52 रन करून अभिषेक पॅव्हेलियनमध्ये परतला. रचिन रवींद्रने अभिषेकची विकेट घेतली.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमने 50 पेक्षा जास्त रनची ओपनिंग पार्टनरशीप केली आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये लॉकी फर्ग्युसनने टाकलेली 24 रनची ओव्हर संयुक्तरित्या तिसरी सगळ्यात महागडी ओव्हर ठरली. याआधी बेन स्टोक्स आणि अक्षर पटेल यांनीही टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये 24 रन दिल्या होत्या.
या टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा शून्य रनवर आऊट झाला होता, तसंच झिम्बाब्वेविरुद्धचं अर्धशतक वगळता त्याला संघर्षच करावा लागला होता, त्यामुळे अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू द्यावा, अशी मागणी माजी क्रिकेटपटूंसह भारतीय क्रिकेट चाहतेही करत होते, पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांनी अभिषेकवर विश्वास दाखवला. हा विश्वास अभिषेकने फायनलमध्ये सार्थ करून दाखवला.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
Mar 08, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 8 मॅच अन् 29 दिवस शांत राहिला, पण फायनलमध्ये 'फुटला', सगळ्यांचा राग न्यूझीलंडवर काढला!







