advertisement

Kitchen Hacks : हिरवी मिरची धुताना तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना? वाढू शकतात बॅक्टेरिया, लवकर लागेल बुरशी!

Last Updated:
Green chili washing tips : तिखट खाणाऱ्या लोकांना हिरवी मिरची खूप आवडते. मग ती पोह्यांमधली असो, वडापावसोबत मिळेल तळलेली मिरची असो की मिरच्यांची भजी असो. ती प्रत्येक प्रकारे खायला यांना आवडते. मात्र हीच मिरची जर योग्य पद्धतीनं धुतल्या गेली नाही, तर ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला पाहूया कसे.
1/9
हिरवी मिरची फक्त तिखट चवीसाठीच प्रसिद्ध नाही, तर तिच्यामध्ये अनेक पोषक गुणधर्मदेखील असतात. म्हणून आपल्या आहारात थोडा का होईना मिरचीचा समावेश असावा असं वडीलधारी मंडळी म्हणतात. मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

2/9
पण ही पोषक मिरची आपण व्यवस्थित धुतली नाही तर ती वाईट परिणाम करू शकते. व्यवस्थित न धुतल्यास मिरचीमध्ये घाण आणि कीटकनाशकं तशीच राहतात. चुकीच्या पद्धतीने धुतल्यानं मिरच्यांचा बाहेरचा थर खराब होतो आणि बॅक्टेरिया आत प्रवेश करू शकतात.

3/9
हिरव्या मिरच्या पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी लोक त्या जास्त काळ पाण्यात ठेवतात. मात्र तज्ञांच्या मते, मिरच्या जास्त वेळ पाण्यात ठेवल्याने बॅक्टेरिया पृष्ठभागावरून मिरचीच्या आत जाऊ शकतात. विशेषतः जेव्हा मिरच्यांवर कट असतील तर याचा धोका वाढतो. यामुळं मिरच्या लवकर सडतात किंवा त्यांची चव बिघडू शकते.

4/9
मिरच्या धुण्याची योग्य पद्धत म्हणजे, वाहत्या पाण्याखाली हाताने हलक्या घासून त्या स्वच्छ करणे. गृहिणी संगीता यांनी सांगितलं की, मिरच्या धुण्यापूर्वी देठ काढू नये. कारण यामुळं पाणी आणि घाण मिरच्यांच्या आतील भागांमध्ये आणि बियांमध्ये पोहोचते. अशानं मिरच्यांमध्ये बुरशीचा धोका वाढतो. म्हणून मिरची  धुऊन आणि वाळवूनच देठ काढा.

5/9
जंतू मारण्यासाठी उकळत्या किंवा गरम पाण्यात मिरच्या टाकू नका. कारण मिरचीची बाह्य साल खूप नाजूक असते आणि गरम पाणी त्याच्या पेशींना नुकसान करते. यामुळं मिरच्या फ्रिजमध्ये ठेवल्यावर मऊ आणि काळ्या होतात. म्हणून मिरच्या धुण्यासाठी साधं किंवा कोमट पाणी वापरा.

6/9
हिरव्या मिरच्यांवरील कीटकनाशके आणि रसायने काढण्यासाठी साधं पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ आणि थोडं पांढरं व्हिनेगर घाला. या द्रावणात मिरच्या फक्त 2 ते 3 मिनिटे भिजवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. मीठ आणि व्हिनेगर नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करतात. याने मिरच्यांचे नुकसान होत नाही आणि त्या स्वच्छही होतात.

7/9
एक महत्त्वाची चूक टाळा ती म्हणजे, मिरच्या धुतल्यानंतर त्या ताबडतोब कंटेनर किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ओल्या ठेवणे. ओलाव्यामुळं जीवाणूंचा वाढतात. म्हणून मिरच्या धुतल्यानंतर स्वच्छ सुती कापडावर किंवा मोठ्या टिश्यू पेपरवर पसरवा. पाणी पूर्ण सुकू द्या आणि नंतर त्या फ्रिजमध्ये ठेवा. वेळ नसेल तर तुम्ही त्या फॅनखाली सुकवू शकता. एक महत्त्वाची चूक टाळा ती म्हणजे, मिरच्या धुतल्यानंतर त्या ताबडतोब कंटेनर किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ओल्या ठेवणे. ओलाव्यामुळं जीवाणूंचा वाढतात. म्हणून मिरच्या धुतल्यानंतर स्वच्छ सुती कापडावर किंवा मोठ्या टिश्यू पेपरवर पसरवा. पाणी पूर्ण सुकू द्या आणि नंतर त्या फ्रिजमध्ये ठेवा. वेळ नसेल तर तुम्ही त्या फॅनखाली सुकवू शकता.
एक महत्त्वाची चूक टाळा ती म्हणजे, मिरच्या धुतल्यानंतर त्या ताबडतोब कंटेनर किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ओल्या ठेवणे. ओलाव्यामुळं जीवाणूंचा वाढतात. म्हणून मिरच्या धुतल्यानंतर स्वच्छ सुती कापडावर किंवा मोठ्या टिश्यू पेपरवर पसरवा. पाणी पूर्ण सुकू द्या आणि नंतर त्या फ्रिजमध्ये ठेवा. वेळ नसेल तर तुम्ही त्या फॅनखाली सुकवू शकता.
advertisement
8/9
शेवटची महत्त्वाची गोष्ट, मिरच्या साठवण्यासाठी एअर टाईट डबा वापरा. डब्यामध्ये खाली आधी तळाशी कागदी टॉवेल किंवा टिश्यू पेपर लावा. हे फ्रिजमध्ये निर्माण होणारा ओलावा शोषून घेते. तसेच मिरच्या तपासा आणि जर काही मिरच्या वाळलेल्या किंवा पिवळ्या दिसल्या तर त्या लगेच काढून टाका. कारण एक खराब मिरची सगळ्या मिरच्या खराब करू शकते.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement