IND vs NZ महासंग्राम; भारतासाठी अभिजीत सावंतचं थेट विमानातून साकडं! अहमदाबादच्या मैदानावर इतिहास घडणार? VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
IND vs NZ T20 World Cup 2026 Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड अशा या अटीतटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारताने कप जिंकावा यासाठी घराघरात देवाचा धावा सुरू झाला आहे.
IND vs NZ WC Final: आज अख्खा भारत एकाच गोष्टीची वाट पाहतोय... टीम इंडिया वर्ल्ड कप कधी उचलणार? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा फायनल थरार रंगत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड अशा या अटीतटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारताने कप जिंकावा यासाठी घराघरात देवाचा धावा सुरू झाला आहे.
भारतासमोर इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी
टीम इंडियासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकाही देशाला सलग दोन वर्ल्ड कप जिंकता आलेले नाहीत आणि मायदेशात खेळताना ट्रॉफी उंचावण्याचा मानही कोणाला मिळाला नाही आहे. आज जर भारताने मैदान मारले, तर हे दोन्ही रेकॉर्ड्स मोडीत निघतील. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ अजूनही आपल्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या शोधात आहे.
advertisement
अभिजीत सावंतचे विमानातून साकडं
या महामुकाबल्यासाठी संपूर्ण भारतभरातून प्रार्थनांचा महापूर आला आहे. कोणी मंदिरात अभिषेक घालत आहे, तर कोणी होम-हवन करत आहे. अशातच, लोकप्रिय गायक आणि आयडल स्टार अभिजीत सावंत याने टीम इंडियाच्या विजयासाठी चक्क विमानातून देवाला साकडे घातले आहे.
advertisement
advertisement
अभिजीतने सोशल मीडियावर एक अत्यंत गमतीशीर रील शेअर केली आहे. मॅच पाहण्यासाठी अहमदाबादला जात असताना त्याने आकाशातूनच देवाला प्रार्थना केली. त्याने रीलमध्ये लिहिले, "फ्लाइटमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो आणि मी टीम इंडियाच्या विजयासाठी!" त्याची ही हटके स्टाईल आणि टीम इंडियाप्रती असलेले प्रेम पाहून चाहत्यांनी त्याच्या रीलवर लाइक्सचा वर्षाव केला आहे. अभिजीतप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आज टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत.
advertisement
स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची अलोट गर्दी झाली असून 'इंडिया... इंडिया...' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था आणि १ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना ऐतिहासिक ठरणार, यात शंका नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 7:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
IND vs NZ महासंग्राम; भारतासाठी अभिजीत सावंतचं थेट विमानातून साकडं! अहमदाबादच्या मैदानावर इतिहास घडणार? VIDEO









